Pakistan Crisis : भारतासोबत स्वतंत्र झालेला पाकिस्तान 75 वर्षात का आला विनाशाच्या वाटेवर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Crisis

Pakistan Crisis : भारतासोबत स्वतंत्र झालेला पाकिस्तान 75 वर्षात का आला विनाशाच्या वाटेवर?

Pakistan Crisis : आपल्या शेजारचा देश पाकिस्तान सध्या चांगल्याच आर्थिक संकटात सापडलेला आहे. पेट्रोल पासून तर जेवणापर्यंत पाकिस्तानमध्ये सध्या उणीव आहे. भारतासोबतच १९४७ ला स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानाला अनेक आर्थिक संकटाचा सामना सुरवातीच्या काळापासूनच करावा लागत आहे.

सध्या आर्थिक संकटा ओढावलेला पाकिस्तान त्यातून बाहेर पडण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करत आहे. देशात सगळीकडे मंदी आली आहे. एवढंच काय तर सरकारला आपल्या कर्मचाऱ्यांना सॅलरी देण्यासाठी सुद्धा पैसे नाही. चला तर जाणून घेऊया की भारतासोबत स्वतंत्र झालेला पाकिस्तान ७५ वर्षात रस्त्यावर का आला? (pakistan economy collapse read what and why this happened )

सध्या पाकिस्तानच्या केंद्रीय बँकजवळ फक्त 4.4 अब्ज डॉलर रुपये आहे, जे आठवडयांकरीता आयात करण्यासाठी पुरेसे आहे. केंद्रीय बँकने बेंचमार्क व्याजदर वाढवत 17 टक्के केलंय जे २४ वर्षातील सर्वाधिक व्याजदर आहे.

पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्रानुसार तेल कंपन्याद्वारे कमी पुरवठ्यामुळे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये पेट्रोल पंपवर कार आणि दुचाकींच्या रांगाच रांगा लागल्या.

या आठवड्याच्या सुरवातीपासूनच पाकिस्तानच्या अनेक मोठ्या भागांमध्ये इलेक्ट्रीसिटी नाही शहबाज शरीफ सरकारचे ऊर्जा-बचतचे उपाय व्यर्थ गेले. यामुळे नागरीकांमध्ये दहशतीचं आणि संभ्रमाचं वातावरण आहे.

सोमवारच्या ब्लॅकआउटमुळे स्कूल, कारखाने आणि दुकानांवर गंभीर परिणाम दिसून आला. पाकिस्तानच्या 22 कोटी लोकांमधील अनेक लोक पानी पिण्यासाठी तडफडत होते. कारण विजावर चालणारे पाण्याचे पंपही रिकामे झाले होते.

जागतिक बँकनुसार मागील वर्षी देशात आलेल्या आर्थिक मंदीमुळे पाकिस्तानच्या साठ लाख लोकांना वर्तमानमध्ये गंभीर अन्न असुरक्षेचा सामना करावा लागत आहे. वाढत्या आर्थिक संकटाची परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानमधून अनेक व्हिडीओ समोर आले आहेत ज्यामध्ये स्पष्टपणे लोकांवर दोन वेळच्या उपासमारीची वेळ दिसून आली आहे.

पाकिस्तानच्या केंद्रीय बँकचे गवर्नर जमील अहमदनुसार पाकिस्तान लवकरच आयएमएफच्या सोबत बातचीत वाढवण्याची अपेक्षा करत आहे. पूर्व मध्ये अन्य अधिकाऱ्यांनी IMF मधून लोन मिळून देण्याचं आश्वासन देण्यात आलंय मात्र अजूनही पाकिस्तानला पैसे मिळालेले नाही.