Pakistan : सगळे धंदे सोडले आणि पाकिस्तान मित्रासाठी पाळतोय गाढवं; काय आहे कारण ?

कर्जबाजारी पाकिस्तानची अवस्था इतकी बिकट आहे की, त्यातून सावरण्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे.
donky
donkysakal

गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या खूप वाढली आहे. याचे प्रमुख कारण चीन आहे. चीनने पाकिस्तानमध्ये गाढवे पाळण्यासाठी मोठी गुंतवणूकही केली होती.पाकिस्तानच्या वाईट स्थितीची संपूर्ण जगाला कल्पना आहे . कर्जबाजारी पाकिस्तानची अवस्था इतकी बिकट आहे की, त्यातून सावरण्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे.

दरम्यान, गेल्या तीन वर्षांत येथे गाढवांची संख्या झपाट्याने वाढली आहे. पाकिस्तान इकॉनॉमिक सर्व्हेनुसार गेल्या वर्षभरात देशात गाढवांची संख्या एक लाखाने वाढली आहे. म्हणजेच गेल्या वर्षी जी संख्या ५७ लाख होती. ती आता ५८ लाखांवर पोहोचली आहे. यापूर्वी 2019-20 मध्ये देशात 55 लाख गाढवे होती.

donky
Global News : AI चे जनक हिंटन गुगलमधून पायउतार

2020-21 मध्ये ही संख्या 56 लाखांवर पोहोचली आहे. दरम्यान पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या एवढ्या वेगाने का वाढत आहे, हा मोठा प्रश्न आहे. याचे कारण चीनमध्ये कुठेतरी सांगितले जात आहे. वास्तविक चीनमध्ये गाढवांना खूप मागणी आहे. अशा परिस्थितीत पूर्वी चीनने पाकिस्तानकडे गाढवांचा पुरवठा करण्याची मागणी केल्याचे वृत्त आहे. गाढवांच्या सर्वाधिक संख्येच्या बाबतीत पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर तर चीन पहिल्या क्रमांकावर आहे.

donky
Global News : १६ मुलांच्या बापाचा १६ वर्षांच्या मुलीशी विवाह; कोट्यधीश महापौराचं ६५व्या वर्षी लग्न

चीनने गाढवे मागितले

2022 मध्ये पाकिस्तानी न्यूज डॉनच्या रिपोर्टनुसार, चीनला पाकिस्तानमधून गाढव आणि कुत्रे आयात करायचे होते कारण गेल्या काही वर्षांत चीनमध्ये त्यांची मागणी खूप वाढली होती आणि उत्पादन कमी झाले होते. अशीही बातमी आहे की पाकिस्तानने आपली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन या करारात रस दाखवला आणि गाढवे आणि कुत्रे निर्यात करण्यास सहमती दर्शवली.

donky
Global News : स्वार्थासाठी मुलाचा माथेफिरुपणा; आईच्या मृतदेहासोबत तब्बल सहा वर्षे...

यासाठी पाकिस्तान सरकारने गाढवे पाळली जाणारी 3 हजार एकर जमीनही घेतली होती. पाकिस्तानचे वाणिज्य मंत्रालय आणि सिनेटच्या आयात-निर्यातीच्या स्थायी समितीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. एका अहवालानुसार, 2021 मध्ये पाकिस्तान दरवर्षी 80 हजार गाढवे चीनला पाठवत असे आणि त्या बदल्यात त्यांना चांगली किंमत दिली जात असे. एवढेच नाही तर पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या वाढवण्यासाठी चीनने येथे मोठी गुंतवणूक केली होती.

donky
Global News : पतीच्या मृत्यूनंतर १६ महिन्यांनी महिलेने दिला बाळाला जन्म

चीनमध्ये गाढवांची मागणी का वाढली?

वास्तविक चीन पारंपारिक औषध बनवण्यासाठी गाढवांचा वापर करतो. जिलेटिन हे गाढवांच्या त्वचेपासून मिळते, ज्यापासून चीनमध्ये औषध बनवले जाते. या जिलेटिनसाठी, प्रथम गाढवांना मारले जाते, नंतर त्वचा काढून टाकली जाते आणि उकळते, त्यानंतर त्यातून जिलेटिन मिळते. रिपोर्ट्सनुसार, या जिलेटिनपासून बनवलेली औषधे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com