

A large explosion near a mosque in the Police Lines area of Kohat, Khyber Pakhtunkhwa, Pakistan
esakal
Pakistan Kohat Blast During Friday Prayers : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कोहाट जिल्ह्यात शुक्रवारी मोठा स्फोट झाला. ‘पोलीस लाइन्स’ परिसरातील एका मशिदीजवळ हा स्फोट झाला असून, या दुर्घटनेत किमान १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.