पाकिस्तान जगातला सर्वात प्रदुषित देश तर भारतातलं शहर टॉपला! भारत कितव्या स्थानी?

Pakistan Most Polluted Country 2025 : स्वित्झर्लंडस्थित वायू गुणवत्ता निरीक्षण करणाऱ्या ‘आयक्यूएअर’ या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
Pakistan Most Polluted Country 2025

Pakistan Most Polluted Country 2025

esakal

Updated on

२०२५ या वर्षात पाकिस्तान हा जगातील सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे. येथे हवेची गुणवत्ता जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा तब्बल १३ पट अधिक असल्याचे आढळून आले आहे. तसेच सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीत बांगलादेश दुसऱ्या, तर ताजिकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारत या यादीत सहाव्या क्रमांकावर असून, भारतातील लोनी हे शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे. स्वित्झर्लंडस्थित वायू गुणवत्ता निरीक्षण करणाऱ्या ‘आयक्यूएअर’ या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com