पाकिस्तानच्या मोहम्मद जिनांची 'संपत्ती' शोधून काढणार 'न्यायालय'; आयोग स्थापन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohammad Ali Jinnah

पाकिस्तान स्थापनेच्या एक वर्षानंतर सप्टेंबर 1948 मध्ये जिना यांचं निधन झालं.

पाकिस्तानच्या मोहम्मद जिनांची 'संपत्ती' शोधून काढणार 'न्यायालय'

पाकिस्तानचे (Pakistan) संस्थापक मोहम्मद अली जिना (Mohammad Ali Jinnah) आणि त्यांची बहीण फातिमा जिना (Fatima Jinnah) यांच्या मालमत्ता आणि इतर वस्तूंचा शोध घेण्यासाठी पाकिस्तानच्या न्यायालयानं एक सदस्यीय आयोगाची स्थापना केलीय. सिंध उच्च न्यायालयाच्या (SHC) आदेशानंतर, मंगळवारी निवृत्त न्यायमूर्ती फहीम अहमद सिद्दीकी (Justice Faheem Ahmed Siddiqui) यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आलीय.

जिना आणि त्यांच्या बहिणीच्या बँक खात्यातील शेअर्स, दागिने, वाहने आणि पैशांसह मालमत्तांशी संबंधित 50 वर्षे जुन्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हा आदेश दिलाय. पाकिस्तान स्थापनेच्या एक वर्षानंतर सप्टेंबर 1948 मध्ये जिना यांचं निधन झालं. तर, 1967 मध्ये कराचीत फातिमा यांचं निधन झालंय. न्यायमूर्ती जुल्फिकार अहमद खान यांच्या अध्यक्षतेखालील SHC च्या खंडपीठानं सुनावणीदरम्यान असं निरीक्षण केलं, की वरवर पाहता गायब असलेल्या भावंडांच्या सर्व सूचीबद्ध मौल्यवान वस्तू आणि मालमत्ता अद्याप सापडलेल्या नाहीत. इतर अनेक बाबी, ज्यांचा आधीच्या अहवालात उल्लेख करण्यात आला होता. त्या ताज्या यादीत गहाळ होत्या, असं नमूद केलं गेलंय. फातिमा यांचे नातेवाईक हुसैन वालिजी यांनी ही याचिका दाखल केलीय.

हेही वाचा: रेल्वेची कॉलेज व्हॅनला जोराची धडक; अपघातात एक विद्यार्थी ठार, 9 जखमी

13 ऑक्‍टोबरच्‍या आदेशात, SHC खंडपीठानं जिना आणि फातिमा यांनी सोडलेली मालमत्ता परत मिळवण्‍याचा आणि या मालमत्ता शोधण्‍यासाठी उपलब्‍ध सर्व अधिकार वापरण्‍याचा प्रयत्‍न करण्‍याचा निर्धार केला होता. दरम्यान, कराचीतील कसर-ए-फातिमाच्या विश्वस्तांमध्ये एक वेगळा खटला सिंध उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सामान्यतः मोहट्टा पॅलेस म्हणूनही ओळखला जातो, जो फातिमांच्या मालकीचा होता. आता मोहट्टा पॅलेस हे एक संग्रहालय आणि कला दालन बनलंय.

हेही वाचा: आर्मेनिया-अझरबैजानच्या युद्धात 15 सैनिक ठार; रशियाकडून मागितली मदत

loading image
go to top