बांगलादेशनंतर पाकिस्तानात हिंदू मंदिराची तोडफोड

Pakistan
Pakistanesakal
Summary

पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील कोटरी येथे अज्ञात व्यक्तींनी एका हिंदू मंदिराची तोडफोड केलीय.

पाकिस्तानमधील (Pakistan) सिंध प्रांतातील (Sindh province) कोटरी (Kotri) येथे अज्ञात व्यक्तींनी एका हिंदू मंदिराची (Hindu Temple) तोडफोड केलीय. या घटनेनंतर स्थानिक हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळलीय. हल्लेखोरांनी दिवाळीपूर्वी मंदिराची तोडफोड करून लूट केलीय. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. मूर्ती फोडून हल्लेखोरांनी लाखो रुपयांची रोकड व इतर मौल्यवान वस्तू घेऊन पलायन केल्याची माहिती पाकिस्तानी मीडियाने दिलीय.

याप्रकरणी कोटरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पाहेंजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अल्पसंख्याक मंत्र्यांनी या क्षेत्राच्या एसएसपीकडून अहवाल मागवलाय. गुरुवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी हैदराबादच्या (Hyderabad) जमशोरोमधील कोटरीच्या भागातील प्राचीन शिव मंदिरातून दागिने, सोन्याच्या मूर्ती, प्रसाद, यूपीएस बॅटरी आणि इतर मौल्यवान वस्तू चोरल्या आहेत. आरोपींनी मंदिरातील देवीच्या मूर्तीचेही नुकसान केलंय. चोरीला गेलेले दागिने व इतर वस्तूंची किंमत 20 ते 25 लाख रुपये आहे. परिसरातील मंदिरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीय.

Pakistan
देशात 1.53 लाख आत्महत्या; महाराष्ट्र टाॅपवर; NCRB चा धक्कादायक अहवाल

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्री ज्ञानचंद इसरानी (Gyan Chand Israni) यांनी माहिती मिळताच एसएसपी जमशोरो यांच्याकडून ४८ तासांत घटनेचा अहवाल मागवला असून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. कोटरी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून मंदिरांची सुरक्षा कडक करण्यात आलीय. तर हिंदू समाजानं म्हटलंय, की 4 नोव्हेंबरला दिवाळीपूर्वी हिंदू-मुस्लिम दंगल घडवून आणण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप केला आहे.

Pakistan
TLP नेत्याच्या सुटकेवरून पाकिस्तानात हिंसाचार; 4 पोलिस ठार, 250 जण जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com