
सोशल मीडियावर पाकिस्तान देशातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच तेथील एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झालाय. पाकिस्तानमध्ये नेत्यांच्या पोस्टरला चप्पल बूट मारण्याची एक अनोखी स्टाईल चर्चेचा विषय ठरली. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. (pakistan people opposed leaders by new invention Automatic Laanat Machine video goes viral)
निषेध करणे, मोर्चे काढणे, आंदोलन करण्याचे वेगवेगळे प्रकार आपण बघितले असाल पण सध्या पाकिस्तामध्ये नेत्यांविरोधात निषेध व्यक्त करताना नेत्यांच्या पोस्टरला अनोख्या स्टाईलमध्ये चप्पल बुट मारण्याचा व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ पाहून हसू आवरता येणार नाही.
व्हायरल व्हिडिओमधील पोस्टर मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif), मौलाना फजलुर रहमान (Maulana Fazlur Rehman) आणि आसिफ अली झरदारी (Asif Ali Zardari) या तीन नेत्यांचा फोटो आहे.या फोटोंसमोर लाकडी स्टँड तयार करण्यात आलाय. सोबतच ज्याला तीन चप्पल लावल्या आहेत. आणि सोबतच दोरीही जोडली आहे.ही दोरी ओढताच या तीन नेत्यांच्या चेहऱ्यावर चप्पल पडते.
हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. नेटकरी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.