esakal | पाकिस्तानची मस्ती उतरली; 'हा' मोठा निर्णय केला रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

पाकिस्तानची मस्ती उतरली; 'हा' मोठा निर्णय केला रद्द

जीवनावश्यक औषधांची कमतरता जाणवू लागल्याने पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सरकारने भारतात तयार झालेल्या जीवनावश्यक औषधांच्या आयातीला परवानगी दिली आहे.

पाकिस्तानची मस्ती उतरली; 'हा' मोठा निर्णय केला रद्द

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इस्लामाबाद : कलम 370 रद्द केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने अनेक टोकाचे निर्णय घेतले होते. पण आता तेच निर्णय त्यांच्यावर उलटल्यानंतर पाकिस्तानची मस्ती उतरली असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. जीवनावश्यक औषधांची कमतरता जाणवू लागल्याने पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सरकारने भारतात तयार झालेल्या जीवनावश्यक औषधांच्या आयातीला परवानगी दिली आहे.

अणुयुद्धाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानचे घूमजाव

औषधांच्या आयात आणि निर्यातीला पाकिस्तानच्या व्यापर मंत्रालयाने परवानगी दिली असून यासंबंधी एक अध्यादेश जारी करण्यात आला आहे. पाकिस्तान मोठ्या प्रमाणात भारतात तयार झालेली औषधांची आयात करत असतो.

भारत पाकिस्तान युद्धाबाबत इम्रान खान म्हणतात...

भारताशी व्यापार पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तेथील संघटनेनेही म्हटले होते की, भारतातून येणारा कच्चा माल तसेच औषधांचा कधीही तुटवडा निर्माण होऊ शकतो. जोपर्यंत पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत आयातीमध्ये सवलती दिल्या पाहिजे असे या संघटनेने सांगितले होते. आता पाकिस्तानकडे पर्याय नसल्यामुळे त्याने पुन्हा एकदा भारतासोबत व्यापार सुरू केला आहे.

loading image
go to top