युक्रेन-रशिया युद्धावेळी पाकिस्तानचे PM इम्रान खान मॉस्कोमध्ये; म्हणाले, ''मी खूप...''|Pakistan PM Imran Khan Visit Russia | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan PM Imran Khan Visit Russia

युक्रेन-रशिया युद्धावेळी पाकिस्तानचे PM इम्रान खान मॉस्कोमध्ये; म्हणाले, ''मी खूप...''

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. 23 वर्षात पाकिस्तानचे पंतप्रधानांनी पहिल्यांदाच रशियाला भेट (Pakistan PM Imran Khan Visit Russia) दिली आहे. सध्याचा युक्रेन-रशियामधील तणाव (Ukraine Russia Conflict) पाहता त्यांच्या रशिया दौऱ्यावरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इम्रान खान यांच्या दौऱ्यावर अमेरिकेनेही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. युक्रेनमधील रशियाच्या कारवायांवर आक्षेप घेणे हे प्रत्येक ‘जबाबदार’ देशाची कर्तव्य असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. युक्रेन तणावावर अमेरिकेने पाकिस्तानला आपली भूमिका स्पष्ट करण्यास देखील सांगितले आहे.

हेही वाचा: Ukraine-Russia War Photos| युक्रेनच्या सैनिकांनी खोदले बंकर, घडामोडींना वेग

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मॉस्कोमध्ये इम्रान खान आणि पुतिन यांच्या भेटीबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले की, ''रशियाने युक्रेनवर नुकत्याच केलेल्या हल्ल्याबाबत आम्ही पाकिस्तानला आमची भूमिका कळवली आहे. युद्धावर मुत्सद्देगिरी पुढे नेण्याच्या आमच्या प्रयत्नांचीही आम्ही त्यांना माहिती दिली आहे.''

इम्रान खान रशिया दौऱ्यावर -

इम्रान खान बुधवारी मॉस्कोला रवाना झाले. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात खान पुतिन यांच्यासोबत बैठका घेतील आणि आर्थिक सहकार्यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करतील. रशियन लष्कराने युक्रेनवर हल्ला केला असून, सातत्याने बॉम्बचा वर्षाव होत आहे. अशावेळी इम्रान खान अशावेळी रशियात पोहोचले आहेत. गुरुवारी सकाळपासून राजधानी कीव्ह आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये स्फोट होत आहेत.

इम्रान खान म्हणाले...

दरम्यान, इम्रान खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. मॉस्कोमध्ये उतरल्यानंतर ही घटना असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये इम्रान खान यांच्यासोबत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशीही दिसत आहेत. व्हिडिओमध्ये इम्रान खान हे बोलताना ऐकू येतात, 'मी इथे कोणत्या वेळ आलोय याची मला खूप उत्सुकता आहे.' थोड्या वेळाने ते पुन्हा म्हणतात, 'मी खूप उत्सुक आहे.' इम्रान खान हे मॉस्कोमध्ये असताना रशियन सैन्याने युक्रेनमध्ये प्रवेश केला असून पुतिन यांनी पूर्व युक्रेनमध्ये विशेष लष्करी कारवाईचे आदेश दिले आहेत.

रशियन हल्ल्यादरम्यान पाक पंतप्रधान मॉस्कोला पोहोचले -

इम्रान खान रशियाला रवाना होण्याच्या काही तास आधी अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी अशा अनेक नाटो देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध जाहीर केले आहेत. रशियन सैन्याने पूर्व युक्रेनमध्ये प्रवेश केल्यानंतर रशियाला पोहोचणारे इम्रान खान हे पहिले विदेशी नेते आहेत.

Web Title: Pakistan Pm Imran Khan Visit Moscow In Ukraine Russia Conflict Says I Am So Excited

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top