esakal | पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ! PM इम्रान खान अडचणीत; ICIJ चा गौप्यस्फोट
sakal

बोलून बातमी शोधा

imran khan

पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ! PM इम्रान खान अडचणीत

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नवी दिल्ली : 'इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नालिस्ट्स'ने (ICIJ) आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानमधील सत्ताधारी आणि विरोधकांच्या नावांचा समावेश आहे. गौप्यस्फोटानंतर पाकिस्तानच्या (Pakistan news) राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. नेमके प्रकरण काय आहे?

'आर्थिक गैरव्यवहार' जगासमोर उघड

जगभरातून 119 कोटी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हा 'आर्थिक गैरव्यवहार' जगासमोर उघड झाला आहे. 117 देशांतील 600 पत्रकार याच्या तपासात सहभागी होते, असे 'आयसीआयजे'ने सांगितले. पँडोरा पेपर लीकचा (Pandora leaks) 'आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणला असून गौप्यस्फोटानंतर पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. 'इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नालिस्ट्स'ने 'पँडोरा पेपरलीक'द्वारे आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. पँडोरा पेपर्स लीकमध्ये पाकिस्तानमधील सत्ताधारी आणि विरोधकांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळच्या लोकांसह लष्करी अधिकारी, विरोधी पक्षातील नेत्यांसह जवळपास 700 जणांच्या नावांचा समावेश आहे. यांची मालमत्ता परदेशात शेल कंपन्यांच्या स्वरूपात असल्याचा आरोप आहे. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी 'पनामा पेपर लीकने जगभरात खळबळ उडवली होती. त्यानंतर आता पँडोरा पेपर्स लीक प्रकरण समोर आले आहे. पनामा पेपरमध्ये माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर पाकिस्तानमधील कोर्टात त्यांच्याविरोधात खटला चालला. यामध्ये शरीफ दोषी आढळले होते.

हेही वाचा: उत्तर कोरियाची ‘यूएन’लाच धमकी

कोणाकोणाचा समावेश?

पाकिस्तान सरकारचे अर्थमंत्री शौकत तारिन, जलसंपदा मंत्री मुनिस इलाही, खासदार फैसल वावडा, उद्योग आणि उत्पादन मंत्री खुसरो बख्तियार यांच्या नावाचा समावेश आहे. तर, माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे नातेवाईक इशाक डार, बिलावट भुट्टो यांच्या पीपीपी पक्षाचे शारर्जिल मेमन यांचीही नावे समोर आली आहेत. त्याशिवाय पाकिस्तानमधील काही निवृत्त लष्करी अधिकारी, व्यावसायिक आणि माध्यम कंपन्यांच्या मालकांच्या नावाचा समावेश आहे.

सचिन तेंडुलकरसह ३०० हून अधिक भारतीय उद्योजकांची नावे

तपास यंत्रणांना गुंगारा देणे, कर प्रणालीतून पळवाटा शोधून आपली संपत्ती सुरक्षित ठिकाणी लपवण्यासाठी जगभरातील अतिश्रीमंतांनी केलेले धक्कादायक प्रयत्न 'पँडोरा पेपर्स'मधून समोर आले आहेत. 'इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने 'पँडोरा पेपर्स'ने केलेल्या या गोपनीय तपासाचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यात भारतरत्न सचिन तेंडुलकरसह ३०० हून अधिक भारतीय उद्योजकांची नावे असल्याने कॉर्पोरेट जगतात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: तालिबानच्या क्रूर राजवटीत पत्रकारावर आली मजुरीची वेळ

पनामा पेपर्सनंतर आर्थिक गैरव्यवहाराचा 'पँडोरा' गौप्यस्फोट;

पँडोरा पेपर्सने सात गोपनीय पत्रांचा तपशील उघड केला आहे. श्रीमंतांनी कशा प्रकारे आपली संपत्ती कर बचत किंवा कर चुकवेगिरीसाठी विविध देशांमध्ये किंवा स्वतंत्र बेटांवर दडवली आहे, याची माहिती या सात पत्रांचा खोलात जाऊन पाठपुरावा केल्यानंतर उघड झाली आहे. (ICIJ, ) या जागतिक पातळीवरील पत्रकारांच्या समूहाने विशेष शोध मोहीम राबवली. या दरम्यान देशातील १४ कंपन्यांचे थोडेथोडके नव्हे तर तब्बल १ कोटी २० लाख कागदपत्रे आणि २९ हजार मालकी कंपन्यांची गोपनीय माहिती तपासली असल्याचा दावा पँडोरा पेपर्सने केला आहे.

इम्रान खान म्हणतात...
कोणताही देश गरीब नसतो. मात्र, भ्रष्टाचारामुळे गरिबी निर्माण होते. गैरमार्गाने संपत्ती साठवून ठेवणाऱ्या श्रीमंताचे सत्य समोर आणले गेले असल्याचे सांगत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पँडोरा पेपरलीकचे स्वागत केले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून दोषीवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

loading image
go to top