esakal | कुलभूषण जाधव यांना भारतीय वकील देण्यास पाकिस्तानचा नकार
sakal

बोलून बातमी शोधा

Kulbhushan

पाकिस्तानच्या कैदेत असलेले कुलभूषण जाधव यांना भारतीय वकील देण्याची मागणी पाकिस्तानने फेटाळून लावली आहे. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानाच्या न्यायालयात  त्यांची बाजू मांडण्यासाठी एखाद्या भारतीय वकिलाला परवानगी देणं आम्हाला कायदेशीररित्या शक्य नाही, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानने गुरुवारी दिली आहे. भारताच्या मागणीसंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ता जाहिद हफीज चौधरी यांनी ही माहिती दिली.

कुलभूषण जाधव यांना भारतीय वकील देण्यास पाकिस्तानचा नकार

sakal_logo
By
यूएनआय

पाकिस्तानच्या कैदेत असलेले कुलभूषण जाधव यांना भारतीय वकील देण्याची मागणी पाकिस्तानने फेटाळून लावली आहे. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानाच्या न्यायालयात  त्यांची बाजू मांडण्यासाठी एखाद्या भारतीय वकिलाला परवानगी देणं आम्हाला कायदेशीररित्या शक्य नाही, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानने गुरुवारी दिली आहे. भारताच्या मागणीसंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ता जाहिद हफीज चौधरी यांनी ही माहिती दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'जाधव यांचं पाकिस्तानच्या न्यायालयात प्रतिनिधित्व करण्यास भारतीय वकिलांना परवानगी देण्याची भारत अशक्य अशी मागणी करीत आहे. आम्ही त्यांना वारंवार सांगितले आहे की फक्त तेच वकील न्यायालयात जाधव यांचे प्रतिनिधित्व करू शकतात, ज्यांच्याकडे पाकिस्तानमध्ये वकिली करण्याचा परवाना आहे. याअगोदर भारतीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयामध्ये असेही म्हटले आहे की परदेशी वकील देशामध्ये वकिली करू शकत नाहीत. त्यामूळे भारताच्या या मागणीबद्दल आम्हाला याबद्दल आश्चर्य आहे, अशी प्रतिक्रियाही प्रवक्ते जाहिद हफीज चौधरी यांनी दिली.

'जो बायडेन यांचा विजय झाल्यास चीन अमेरिका ताब्यात घेईल'

एप्रिल 2017 मध्ये भारतीय नौदलाचे माजी अधिकारी जाधव  कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान लष्करी कोर्टाने हेरगिरी व दहशतवादाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती.  याआधी, आढावा याचिकेवर सुनावणी होत असताना, पाकिस्तानच्या न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेचेविरुध्द प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतीय वकीलाला परवानगी द्यावी अशी भूमिका भारताने घेतली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही जाधव यांच्या संदर्भात पाकिस्तानच्या संपर्कात आहोत.

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा राजीनामा

याआधी हेरगिरीचा खोटा आरोप करत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी पाकिस्ताने नवी खेळी केली होती. रिव्ह्यू पेटिशन दाखल करता येऊ नये यासाठी पाककडून प्रयत्न केले होते. पाकिस्तानने दबाव टाकून कुलभूषण जाधव यांच्याकडून हवा तसा जबाब नोंदवून घेतला होता. त्यानंतर फेअर ट्रायलशिवाय मृत्यूदंडाची शिक्षाही सुनावली होती. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव या निर्णयाविरुद्ध अपील करणार नाहीत. त्यामुळे जाधव यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या भारतासमोरच्या अडचणी आता वाढत आहेत आता भारतीय वकील देण्यासाठीही पाकिस्तानने नकार दिली आहे. याआधी पाकिस्तानला या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दणका दिला होता. पाकिस्तानने फाशीच्या निर्णयाला स्थगिती देऊन पुनर्विचार करावा असे आदेशही दिले होते.

Edited By - Prashant Patil