कुलभूषणप्रकरणी पाकचा आडमुठेपणा; वाचा सविस्तर

पीटीआय
Saturday, 12 September 2020

भारत निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना सर्व राजनैतिक पर्याय वापरून वकील मिळवून देण्याचा प्रयत्न करत असताना पाकिस्तानने आडमुठेपणा कायम ठेवला आहे. जाधव यांना केवळ स्थानिक नोंदणीकृत वकील वापरण्याची परवानगी पाकने दिली.

इस्लामाबाद - भारत निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना सर्व राजनैतिक पर्याय वापरून वकील मिळवून देण्याचा प्रयत्न करत असताना पाकिस्तानने आडमुठेपणा कायम ठेवला आहे. जाधव यांना केवळ स्थानिक नोंदणीकृत वकील वापरण्याची परवानगी पाकने दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतापुढे पाकिस्तानच्या न्यायालयांना सहकार्य करण्याखेरीज दुसरा पर्याय नाही, असा कांगावा पाकिस्तानने केला आहे. जिओ न्यूजने याप्रकरणी वृत्त दिले आहे. इस्लामाबाद न्यायालयाने ६ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी तहकूब केली. जाधव व भारतीय वकिलातीच्या अधिकाऱ्यांना संभाषण करता यायलाच हवे. पाकिस्तानने त्याचे रेकॉर्डिंग करू नये, अशी विनंतीही भारताने केली आहे.

कोरोनाचे पूर्ण परिणाम दिसणं बाकी; WHO नंतर UN च्या तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

पाकचा कांगावा
कुलभूषण जाधव यांना वकील नेमण्यासाठी भारताला न्यायिक आदेश सुपूर्त केला आहे. मात्र, भारतानेच अद्याप प्रतिसाद दिला नसल्याचा कांगावा पाकिस्तानने केला. याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाच्या तत्त्वाची अंमलबजावणी करण्यास पाकिस्तान कटिबद्ध असल्याचा दावा पाकच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते जाहिद हाफीज चौधरी यांनी केला.

धक्कादायक! देशात मे महिन्यात होते ६४ लाख रुग्ण; ICMR सिरो सर्वेक्षणाची माहिती

आम्ही पाकिस्तानशी सर्व राजनैतिक पर्याय वापरून संपर्क करत आहोत. जाधव यांना भारतीय वकील देण्याबाबत पाकला विचारणा केली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या पत्रानुसार स्वतंत्र व निष्पक्ष सुनावणीवर आमचा विश्वास आहे. 
- अनुराग श्रीवास्तव, प्रवक्ते, परराष्ट्र मंत्रालय

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan stubbornness in Kulbhushan case