esakal | जुनागढ नव्या नकाशात दाखवल्यानंतर पाकिस्तानची पुढची चाल; तैनात केली लढाऊ विमाने
sakal

बोलून बातमी शोधा

india_pak.jpg

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तान गुजरातच्या कच्छचे रणपासून 130 किलोमीटर अंतरावर असलेले आपले हवाईतळ अपग्रेड करत आहेत.

जुनागढ नव्या नकाशात दाखवल्यानंतर पाकिस्तानची पुढची चाल; तैनात केली लढाऊ विमाने

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

इस्लामाबाद- भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तान गुजरातच्या कच्छचे रणपासून 130 किलोमीटर अंतरावर असलेले आपले हवाईतळ अपग्रेड करत आहेत. पाकिस्तानच्या वायूदलाने या तळावर 28 एफ-16 विमाने तैनात केले आहेत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे आपल्या विवादित नकाशामध्ये भारताच्या जुनागढला दाखवले होते. नवभारत टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. 

घरी चिमुकल्या पावलांची चाहूल आणि वडिलांनी विमान अपघातात सोडले प्राण

उपग्रह छायाचित्रांमधूल खुलासा 

ओपन सोर्स इंटेलिसेंस adetresfa च्या उपग्रह छायाचित्रांमधून पाकिस्तान आपले हवाईतळ सुधारित करत असल्याचं उघड होत आहे. पाकिस्तानने भोलारी हवाईतळावर लष्करी विमानांसाठी पक्का निवारा तयार केला आहे. पाकिस्तानी वायू दलाने याठिकाणी 16 विमान निवारागृहे तयार केले आहेत. उर्वरित 12 निवारे बनवण्याचं काम वेगाने सुरु आहे. हे नवीन निवारागृहे विमानांना हवाई हल्ल्यामध्ये सुरक्षा पुरवत असतात. 

महत्वपूर्ण आहे भोलारी हवाईतळ

पाकिस्तानचा भोलारी हवाईतळ भारतीय सीमेपासून केवळ 130 किलोमीटर अंतरावर आहे. सामरिक दृष्टीने पाकिस्तान या हवाईतळावरुन भारतीय भागावर आपली पकड मजबूत करण्याची तयारी करत आहे. 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध याच भागात लढण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या सामरिक गरजा पूर्ण करण्यासाठी भोलारी हवाईतळाची स्थापना करण्यात आली होती. 

केरळ विमान दुर्घटनेतील मृतांचा आला कोविड-19 रिपोर्ट

भारताची तयारीही चोख
 
पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची भारताची तयारी आहे. या भागात भारतीय वायूदलाचे अनेक तळ आहेत. त्यामुळे पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला भारतीय जवान योग्य उत्तर देऊ शकतात. भारताने या भागात सुखोई, मिग-21 आणि जॅगवार लढाऊ विमाने तैनात केली आहेत. 

दरम्यान, जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम 370 हटवल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आपला नवा नकाशा जाहीर केला असून यात सियाचिन, लडाख आणि गुजरातमधील जुनागड हे भाग नव्याने दाखवले आहेत. आमचं लक्ष्य श्रीनगर असल्याचं पाकिस्ताचे मंत्री मेहमुद कुरेशी म्हणाले आहेत. 

(edited by-kartik pujari)