अमेरिकेत पुन्हा गोळीबार; लॉकडाउन केलेला पेंटॅगॉनचा परिसर पूर्वपदावर

सार्वजनिक ठिकाण असलेल्या बस स्टेशनबाहेर घडली घटना
pentagon attack
pentagon attack

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या संरक्षण विभागाचं मुख्यालय असलेल्या पेंटॅगॉनजवळील एका मेट्रो बस स्टेशनच्या बाहेर मंगळवारी गोळीबाराची घटना घडली. यानंतर इथल्या संपूर्ण परिसरात लॉकडाउन करण्यात आला होता. मात्र, आता परिस्थती नियंत्रणात आली असून हा लॉकडाउन हटवण्यात आला आहे. पेंटॅगॉन फोर्स प्रोटेक्शन एजन्सीनं ही माहिती दिली.

पेंटॅगॉन फोर्स प्रोटेक्शन एजन्सीनं म्हटलं की, गोळीबाराचं घटनास्थळ सध्या सुरक्षित असलं तरी ते अद्याप गुन्हा घडल्याचं अॅक्टिव्ह ठिकाण आहे. दरम्यान, पेंटॅगॉन इमारतीजवळील वाहतूक पेंटॅगॉन शहराकडे वळवण्यात आली आहे.

दरम्यान, पेंटॅगॉन वर्कफोर्सला पाठवलेल्या एका संदेशात या गोळीबाराच्या घटनेची माहिती देण्यात आली होती. ज्या मेट्रो बस स्टेशनजवळ हा गोळीबार झाला त्या स्टेशनवरुन अनेक लाईनवरील बसेस सोडल्या जातात. अमेरिकेत यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com