कृत्रिमरितीने तयार करण्यात आलेले मांस स्थानिक बाजारात विकण्याची सिंगापूर सरकारची परवानगी

वृत्तसंस्था
Thursday, 3 December 2020

सिंगापूर सरकारने अमेरिकेतील स्टार्टअप ‘जस्ट ईटला’ला प्रयोगशाळेमध्ये कृत्रिमरितीने तयार करण्यात आलेले मांस स्थानिक बाजारात विकण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान कृत्रिम मांसाला एखाद्या देशाच्या नियामक यंत्रणेने परवानगी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मांसासाठी कोणत्याही प्राण्यास अथवा पक्ष्याला मारण्याची  आवश्‍यकता नसल्याने त्याला ‘क्लीन मीट’ असे संबोधण्यात येते.

सिंगापूर - सिंगापूर सरकारने अमेरिकेतील स्टार्टअप ‘जस्ट ईटला’ला प्रयोगशाळेमध्ये कृत्रिमरितीने तयार करण्यात आलेले मांस स्थानिक बाजारात विकण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान कृत्रिम मांसाला एखाद्या देशाच्या नियामक यंत्रणेने परवानगी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मांसासाठी कोणत्याही प्राण्यास अथवा पक्ष्याला मारण्याची  आवश्‍यकता नसल्याने त्याला ‘क्लीन मीट’ असे संबोधण्यात येते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागील काही वर्षांमध्ये लोकांमध्ये आरोग्याबाबतची जागरूकता वाढली असून पशू कल्याण आणि पर्यावरणाबाबतदेखील काही देशांनी नव्याने धोरणे आखायला सुरवात केल्याने अशाप्रकारच्या मांसाच्या मागणीने जोर धरला होता. प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या मांसाला लोकप्रिय करण्याचे काम ‘बियाँड मीट आणि इम्पॉसिबल फूड्स’ या दोन कंपन्यांनी केले आहे. आता सिंगापूरमधील फूड मार्केट आणि रेस्टॉरंटमध्ये या मांसापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांची रेलचेल दिसून येईल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अमेरिकेतून गायब झालेला रहस्यमयी खांब दिसला यूरोपात; लोकांमध्ये गोंधळ

स्नायूंच्या पेशींचा वापर
हे क्लीन मीट देखील अनेक प्रक्रियांमधून तयार करण्यात आले आहे. प्राण्यांमधील स्नायूंच्या पेशींवर प्रयोगशाळेमध्येच विविध प्रयोग करून या मांसाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या याबाबतची प्रक्रिया प्राथमिक अवस्थेत असून यासाठीच्या निर्मितीची प्रक्रिया देखील तुलनेने खर्चिक आहे. हे मांस नगेटमध्ये विकले जाणार असून सुरवातीस काही नगेट्सची किंमत ५० डॉलर एवढी असू शकते.

चीनच्या आधीच अमेरिकेत पसरू लागला होता कोरोना; अमेरिकेच्याच रिपोर्टचा नवा दावा

मोठी बाजारपेठ
पुढील वर्षीच्या अखेरपर्यंत या मांसाच्या उत्पादनातून नफा मिळायला सुरवात होईल अशी आशा या स्टार्टअपच्या संस्थापकांनी व्यक्त केली आहे. सध्या जगभरातील चोवीसपेक्षाही अधिक संस्था या कृत्रिम मांसाच्या निर्मितीवर संशोधन करत असून २०२९च्या अखेरपर्यंत यांची जागतिक बाजारपेठ १४० अब्ज डॉलरच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

अशी असेल निर्मिती प्रक्रिया
बायोरिॲक्टरमध्ये सुरवातीला प्राण्यांच्या पेशी तयार करण्यात येतील, त्यामध्ये वनस्पतींमधील पोषक घटकही मिसळले जातील. सुरवातीला हे मांस पारंपरिक चिकनच्या तुलनेमध्ये महाग असेल पण जसे त्याचे उत्पादन वाढेल तशी त्याची किंमत देखील कमी होईल असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. या मांसाच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्राण्यांच्या पेशी या सेल्स बँकेतून खरेदी करण्यात येतील. विशेष म्हणजे या पेशी घेण्यासाठी देखील प्राण्यांना मारण्याची आवश्यकता भासणार नाही. त्या बायोप्सीच्या माध्यमातून त्या प्राण्यांच्या शरीरामधून घेता येतील.

रात्री चमकणाऱ्या लाटांचं सत्य काय, "गुलाबी थंडीत रत्नागिरीतील आरे वारे...

संशोधकांचा उद्देश

  • प्राणी, पक्ष्यांची कत्तल थांबविणे
  • वैश्‍विक तापमान वाढीस चाप लावणे
  • पृथ्वीवरील जैविक संतुलन कायम ठेवणे
  • शाकाहाराला प्रोत्साहन देणे
  • कमी खर्चात अधिक पोषणमूल्ये देणे

प्राण्यांच्या पेशीपासून हे मांस तयार करण्यात आले  असल्याने ते सेवनासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. भविष्यामध्ये हे मांस सिंगापूरमध्ये किरकोळ स्वरूपामध्ये देखील विकण्यात येईल.
- जोश टेट्रिक, सीईओ आणि सहसंस्थापक, जस्ट इट

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Permission Government Singapore sell artificially prepared meat local market