

Wreckage of the crashed tourist aircraft near Nazca, Peru, where 13 people including tourists and pilots lost their lives
esakal
पेरूमधील 'नाझ्का शहराजवळ एका भीषण विमान अपघातात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये ११ पर्यटक आणि दोन वैमानिकांचा समावेश होता. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे विमान 'एरोडियाना' ( या विमान कंपनीचे होते आणि नाझ्का लाइन्सवर पर्यटनासाठीची फेरी करत असताना हा अपघात घडला. विमान कोसळण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही आणि प्रवाशांची ओळखही अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.