esakal | आता कुत्रे, मांजरामध्येही पाहिजे सोशल डिस्टंसिंग
sakal

बोलून बातमी शोधा

pet should keep social distance

घरातील पाळीव प्राण्यांमध्येही सोशल डिस्टंसिंगचे नियम ठेवण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे

आता कुत्रे, मांजरामध्येही पाहिजे सोशल डिस्टंसिंग

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

बर्न: कोरोना महामारीचा परिणाम सध्या जगभरातील अनेक देशांना भोगावा लागत आहे. याकाळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मास्क घालणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळणे हे आहे. हे नियम सध्या फक्त माणसांसाठीच आहेत. पण आता आरोग्यतज्ज्ञांनी कोरोनाचे हे नियम प्राण्यांनाही लागू करावे असा सल्ला दिला आहे.

2 मीटरचे सोशल डिस्टंसिंग महत्वाचे-
द डेली मेलच्या रिपोर्टनुसार, कोरोनावर यशस्वी मात करायची असेल तर स्वित्झर्लंडमधील आरोग्यतज्ज्ञांनी एक सल्ला दिला आहे, ज्यामध्ये घरातील पाळीव प्राण्यांमध्येही सोशल डिस्टंसिंगचे नियम ठेवण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये सांगितले आहे की, कुत्र्यांमध्येही 2 मीटरचे सोशल डिस्टंसिंग ठेवावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

50 शिरच्छेद, मृतदेहांचे तुकडे, गाव भस्मसात, महिलांवर लैंगिक अत्याचार; ISIS चा अमानुष हल्ला

आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला-
एका संशोधनात पाळीव प्राण्यांमध्ये जर सोशल डिस्टंसिंग पाळले गेले नाही तर कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. स्विस पशुवैद्यक जोहान्स कॉफमन म्हणाले, आपल्या पाळीव प्राण्यांमध्येही सोशल डिस्टंसिंगचे नियम लागू केले पाहिजेत. तसेच नाकाचा स्रावांचे प्रमाण जास्त असल्याने कोरोनाव्हायरस पाळीव प्राण्यांत राहण्याची शक्यता आहे, असेही या तज्ज्ञाने सांगितले.

सोशल डिस्टंसिंग महत्वाचे-
स्वित्झर्लंडमधील बर्न विद्यापीठातील व्हायरॉलॉजिस्ट वोल्कर थिएल यांनी अॅनिकुराच्या  जोहान्स कॉफमन यांच्या शिफारशी मान्य केल्या आहेत. ते म्हणाले, 'पाळीव प्राण्यांपासून हा व्हायरस लोकांपर्यंत किंवा इतर पाळीव प्राण्यांपर्यंत पोहचू नये याची काळजी घेण्यासाठी सोशल डिस्टंसिंग उपयुक्त आहे.'

हेही वाचा - अभिमानास्पद! बायडेन यांच्या टीममध्ये 20 पेक्षा अधिक भारतीय वंशाचे व्यक्ती

आतापर्यंत कोणतंही प्रकरण आढळलं नाही-
आतापर्यंत मानवांनामध्ये आपल्या पाळीव प्राण्यांकडून कोरोनाव्हायरसचा संसर्ग झाल्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा मिळालेला नाही. प्राणिसंग्रहालय आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये कोरोनाच्या पॉझिटिव्ह चाचणी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पण आजपर्यंत पाळीव प्राण्यांपासून पाळीव प्राण्यांच्या मालकांपर्यंत प्राण्यांच्या संसर्गाचे कोणतेही प्रकरण आढळून आलेले नाही.

(edited by- pramod sarawale)