लहान मुलांना मारहाण केल्यास ठरणार गुन्हा!

physical Punishment to minors is now a legal crime in Mexico
physical Punishment to minors is now a legal crime in Mexico

मेक्सिको : लहाणपणी आपण मोठ्यांचे काही ऐकले नाही किंवा काही चूक झाली की आपल्याला हमखास फटके मिळायचे. मोठ्यांनी दिलेली ही शिक्षा मुलांना शिस्त लावण्यासाठी असली तरी आता मात्र, हा कायदेशीर गुन्हा झाला आहे. पालकांनी, शिक्षकांनी मुलांना मारणे आता गुन्हा ठरणार आहे. मेक्सिकोने नवीन कायदा मंजुर केला आहे, ज्यानुसार आई- वडील आपल्या मुलांना मारु शकणार नाही. अशी मारहाण झाल्यास हा कायदेशीर गुन्हा ठरेल. हा कायदा मेक्सिकोच्या संसदेत मंजुर झाला असून राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. राष्ट्रपतींचे हस्ताक्षर झाल्यानंतर देशात सदर कायदा लागू होणार आहे. 

बापरे! पुण्यातील धूलिकणांत झाली तब्बल एवढ्या पटींनी वाढ
भारतासह कित्येक देशांमध्ये आपल्या मुलांना वळण लावण्यासाठी पालक, शिक्षक मारणे, फटके देणे सारख्या शिक्षेचा सहसा वापर करत असतात. पण, मारहाणीचा मुलांच्या शारिरिक आणि मानसिक आरोग्यावर खूप परिणाम होत असतो. इतकेच नव्हे तर लहान मुलांना कित्येकदा  शारिरीक, मानसिक छळाला देखील सामोरे जावे लागते. त्यामुळे मुलांच्या सुरक्षितेतेसाठी मेक्सिकोत आता चुकूनही आई- वडील मुलांना मारले तर त्यांच्या विरोधात कारवाई होऊ शकते. मुलांना शारीरीक शिक्षा देण्यास कायदेशीर बंदी टाकणारे विधेयक मेक्सिको संसदेत मंजुर केलं आहे. त्यामुळे मुलांना ढकलणे, केस किंवा कान ओढणे, ओरखडणे, कापणे, मुलांना त्रासदाय ठरेल असे आणणे आता बेकायदेशीर ठरणार आहे. नव्या कायद्यानुसार मुलांना मारणाऱ्यां विरोधात कडक शिक्षेची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. 

बापरे! पुण्यातील धूलिकणांत झाली तब्बल एवढ्या पटींनी वाढ
यूएन चिल्ड्रन फंड 2017 मधील अहवालाअधारे हा कायदा तयार केल्याची माहिती मिळत आहे. या अहवालानुसार, आजपर्यंत 1 ते 14 वयोगटातील जवळपास 63 टक्के मुलांनी शारीरक शिक्षा भोगली असल्याची माहिती समोर येत आहे. जगभरात 2-4 वर्ष वयातील जवळपास 30 कोटी मुल केअरटेकरकडून होणाऱ्या मानसिक किंवा शारिरीक अथवा दोन्ही छळाचा सामना करतात.''मुलांबरोबर होणाऱ्या छळाला काही सीमा नाही. जगात कित्येक मुलांना शाळा, डे-केअर येथे असे अनुभव येत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. लहान मुला- मुलींचा कित्येकदा लैंगिक छळ केला जात असल्याच्या धक्कादायक घटना देखील समोर आल्या आहेत.याबाबात काही अहवाल युएनने जारी केले आहेत. लैंगिक शोषण, शारीरीक अत्याचार, मानिसक अत्याचार, गुन्हेगारी अशा अनेक प्रकारे अत्याचारांना आज काल लहान मुलांना सामोरे जावे लागत असल्याचे (Unicef Child Protection) प्रमुख कॉर्नेलियस विलियम्स यांनी सांगितले आहे.

सुंदर तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट, चॅटिंग सुरू, व्हिडिओ कॉल आणि तरुण अलगद ‘हनी ट्रॅप’मध्ये फसतो

लहान मुलांना अशा छळापासून दूर ठेवण्यासाठी हे प्रयत्न केले जाते आहेत. त्यासाठी अनेक देशांमध्ये कडक कायदे केले जात आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर यूएन सहाकार्यांना अनेक स्वयंसेवी संस्थाही मुलांना सुरक्षित जीवन मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत.

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com