जगातील सर्वाधिक प्रशंसनीय व्यक्तींच्या यादीत PM मोदी आठवे

PM Narendra Modi
PM Narendra Modiesakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची प्रसिध्दी मागील काही वर्षांमध्ये जगभरात कायम वाढत राहिलेली आहे, मोदींनी जगातील सर्वाधिक प्रशंसनीय व्यक्तींच्या यादीत (most admired man in 2021) आठवे स्थान मिळवले आहे. डाटा अॅनालिटीक कंपनी YouGov ने घेतलेल्या एका सर्वेमध्ये 'जगातील सर्वाधिक प्रशंसनीय आणि स्त्रियां'ची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये मोदींनी जगभरातील अनेक दिग्गज व्यक्तींना मागे टाकले आहे. (Worlds Most Admired 2021 male Female List)

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वाधिक प्रशंसनीय पुरुषांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत. तर पंतप्रधान मोदी यांनी देशातील व्यक्तींपैकी बॉलिवुड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) यांना मागे टाकले. ही यादी जगभरातील 38 हजार देशांमधील 42,000 लोकांचे मत घेऊन तयार करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या व्यतिरिक्त या यादीत सचिन तेंडूलकर, शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. तर जगातील सर्वाधिक प्रशंसनीय महिलांच्या यादीत भारताची बॉलिवुड अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra), एश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि सुधा मुर्ती (Sudha Murty) यांचा समावेश आहे.

जगातील 20 सर्वाधिक प्रशंसनीय पुरुष (world's 20 most admired men)

1. बराक ओबामा

2. बिल गेट्स

3. शी जिनपिंग

4. क्रिस्टियानो रोनाल्डो

5. जॅकी चॅन

6. एलोन मस्क

7. लिओनेल मेस्सी

8. नरेंद्र मोदी

9. व्लादिमीर पुतिन

10. जॅक मा

11. वॉरेन बफेट

12. सचिन तेंडुलकर

13. डोनाल्ड ट्रम्प

14. शाहरुख खान

15. अमिताभ बच्चन

16. पोप फ्रान्सिस

17. इम्रान खान

18. विराट कोहली

19. अँडी लाऊ

20. जो बिडेन

PM Narendra Modi
Jio चा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन; फक्त 1 रुपयात 30 दिवस व्हॅलिडिटी

YouGov कंपनीकडून जगभरातील 38 देशातील पॅनलिस्टकडून याबद्दल नॉमिनेशन मागवण्यात आले होते. ज्यामध्ये त्यांना तुमच्या मते सध्या जीवंत असलेल्या व्यक्तींपैकी तुम्हाला सर्वाधिक प्रशंसनीय व्यक्ती समजता असे विचारण्यात आले होते. या सर्वेमध्ये नागरिकांना दोन प्रश्न विचारण्यात आले होते. पहिला प्रश्न होता की तुम्ही या व्यक्तीला प्रशंसनीय व्यक्ती मानता का आणि ती व्यक्ती जगात सर्वाधिक प्रशंसनीय आहे का, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

जगातील 20 सर्वाधिक प्रशंसनीय महिला (world's 20 most admired women)

1. मिशेल ओबामा

2. अँजेलिना जोली

3. राणी एलिझाबेथ II

4. ओप्रा विन्फ्रे

5. स्कारलेट जोहानसन

6. एम्मा वॉटसन

7. टेलर स्विफ्ट

8. अँजेला मर्केल

9. मलाला युसुफझाई

10. प्रियांका चोप्रा

11. कमला हॅरिस

12. हिलरी क्लिंटन

13. ऐश्वर्या राय बच्चन

14. सुधा मूर्ती

15. ग्रेटा थनबर्ग

16. मेलानिया ट्रम्प

17. लिसा

18. लिऊ यिफेई

19. यांग मी

20. Jacinda Ardern

PM Narendra Modi
बहिणीच्या लग्नाआधीच जवान शहीद; CRPF जवानांनी निभावलं भावाचं कर्तव्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com