''तो कोणता पंजा होता जो...'' जर्मनीत PM मोदींचा काँग्रेसला टोला

PM Modi on Congress | Narendra Modi in Germany
PM Modi on Congress | Narendra Modi in Germanysakal
Updated on

बर्लिन : पंतप्रधान मोदी सध्या तीन दिवसांच्या युरोप (PM Modi Europe Visit) दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी जर्मनीला भेट दिली. यावेळी त्यांनी बर्लिनमधील भारतीयांना संबोधित केले. यावेळी मोदींनी काँग्रेसवर निशाणा (PM Modi Attack on Congress) साधला. एक रुपयातील केवळ १५ पैसे जनतेपर्यंत पोहोचतात, या दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या वक्तव्याच्या आडून त्यांनी काँग्रेसवर (Congress) टीका केली.

PM Modi on Congress | Narendra Modi in Germany
लोकसभा निवडणुकांचं बिगुल जर्मनीतून; पंतप्रधान मोदी येताच...

भारतात २०१४ मध्ये २००-४०० स्टार्ट अप होते. आज भारतात स्टार्ट अपची संख्या ६८ हजारांच्या घरात पोहोचली आहे. यापैकी अनेकांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत. जगातील रिअल टाइम डिजिटल पेमेंटमध्ये भारताचा वाटा ४० टक्क्यांवरून अधिक आहे. भारत सरकार शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवत आहे. त्यासाठी देखील डिजिटलायझेशनचा वापर केला जात आहे. आता कोणत्याही पंतप्रधानाला एक रुपयांपैकी १५ पैसे जनतेपर्यंत पोहोचतात, असे म्हणावे लागणार नाही, असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला. तसेच तो कोणता पंजा होता जो एक रुपयांमधील घासून घासून ८५ पैसे घेत होता, असा टोलाही मोदींनी काँग्रेसला लगावला.

21व्या शतकातील हा काळ भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज भारत दृढनिश्चयाने पुढे जात आहे. भारत नवीन वाटांवर चालत आहे. गेल्या आठ वर्षांत भारत प्रत्येक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. राहणीमान, जीवनमान, रोजगार सुलभता, शिक्षणाचा दर्जा, व्यवसाय करणे सुलभ, प्रवासाची गुणवत्ता, उत्पादनांची गुणवत्ता या सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

परदेशातील भारतीयांनी जागतिक स्तरावर मोठी प्रगती साधण्यासाठी देशाला मदत करावी, असं आवाहनही यावेळी मोदींनी केलं. मोदींचे एक तासांचे भाषण संपल्यानंतर बर्लिनमधील भारतीयांनी ''मोदी हैं तो मुमकीन हैं'' आणि २०१४ मे पीएम मोदी फिर एक बार'' अशा घोषणा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com