PM Modi in Germany | लोकसभा निवडणुकांचं बिगुल जर्मनीतून; पंतप्रधान मोदी येताच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi In Berlin
लोकसभा निवडणुकांचं बिगुल जर्मनीतून; पंतप्रधान मोदी येताच...

लोकसभा निवडणुकांचं बिगुल जर्मनीतून; पंतप्रधान मोदी येताच...

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसाच्या युरोप दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी परदेशस्थ भारतीयांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदींच्या बर्लिन भेटीदरम्यान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे संकेतही पाहायला मिळाले, तेही या लोकांच्या घोषणांमधून.

'२०२४ मोदी वन्स मोअर' अशा घोषणा देत उपस्थितांनी झेंडेही फडकवले. नरेंद्र मोदी २०१९ मध्ये सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले. त्यांच्या नेतृत्वाखाली २०१४ पेक्षाही अधिक मतांनी भाजपा २०१९ मध्ये पुन्हा सलग दुसऱ्यांदा निवडून आली. पुढची लोकसभा निवडणूक २०२४ साली होणार आहे.

हेही वाचा: PM मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर; घेणार द्विपक्षीय, बहुपक्षीय बैठका

हेही वाचा: PM Modi Germany Visit : चिमुकलीनं भेट दिलेल्या चित्राकडे मोदी पाहतच राहिले

आपल्या भाषणात मोदी म्हणाले, "मी भाग्यवान आणि की मला जर्मनीमधल्या भारतमातेच्या सुपुत्रांना भेटण्याची संधी मिळाली. तुम्हाला भेटून फार बरं वाटलं. तुमच्यापैकी अनेकजण जर्मनीच्या विविध शहरांमधून बर्लिनमध्ये आला आहात."

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आज मी इथं माझ्याबद्दल किंवा मोदी सरकारबद्दलही बोलायला आलेलो नाही. मला तुमच्याशी कोट्यवधी लोकांच्या क्षमतेबद्दल बोलायचं आहे आणि त्यांचे गोडवे गायचे आहेत. जेव्हा मी कोट्यवधी भारतीयांबद्दल बोलतो, तेव्हा त्यात फक्त तिथे राहणाऱ्यांचाच उल्लेख नसतो, तर जे भारतीय इथे राहतात, त्यांचाही समावेश असतो.

Web Title: Pm Narendra Modi Germany Visit Nris Chant Modi Once More

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top