
"अरे व्वा!"; जपानी मुलाचं हिंदी ऐकून पंतप्रधान मोदी खूश
पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड शिखर परिषदेसाठी जपानला गेले आहेत. या दौऱ्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या क्वाड सदस्य देशांमध्ये सुरक्षा रणनीतीबद्दल चर्चा होणार आहे. दरम्यान, जपानमध्ये टोक्यो इथं पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिथल्या भारतीयांशी संवाद साधला. (PM Narendra Modi in Japan for QUAD summit)
हेही वाचा: QUAD परिषद : ऑस्ट्रेलियाच्या नव्या PM ला भेटणाऱ्या पहिल्या जागतिक नेत्यांमध्ये मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi in Tokyo) टोक्यो इथं पोहोचले असता, जपानमध्ये राहणाऱ्या भारतीयांची त्यांनी भेट घेतली. यावेळी उपस्थितांनी 'मोदी, मोदी', 'भारतमाता के शेर आ रहे है', अशा घोषणाही दिल्या. दरम्यान, जपानमधली काही लहान मुलेही पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी थांबली होती. यावेळी या मुलांनी मोदींना हिंदीतून आपली ओळख करून दिली. त्याबद्दल मोदींनी त्यांचं कौतुकही केलं.
हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जूनला देहूत
पाचवीत शिकणारा विझुकी या जपानी मुलाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपली ओळख हिंदीतून करून दिली. त्यानंतर त्याचं कौतुक करत पंतप्रधान मोदी म्हणाले, व्वा! तू हिंदी कुठून शिकलास? तुला एकदम छान हिंदी जमतंय. पंतप्रधान मोदींनी या मुलाने काढलेल्या चित्रावर स्वाक्षरीही करून दिली.
मी चित्रातून दिलेला संदेश पंतप्रधान मोदींनी वाचला आणि मला त्यांनी स्वाक्षरीही दिली. त्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. मला हिंदी अगदी व्यवस्थित जमत नाही, पण मी हिंदी समजू शकतो, अशी भावना या मुलाने व्यक्त केली आहे.
Web Title: Pm Modi In Japan Interacted With Japanese Children Talked In Hindi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..