गरीब देशांवर पर्यावरणाची हानी केल्याचा आरोप चुकीचा - PM मोदी

pm modi said there misconception that poor countries cause more damage to environment at g7
pm modi said there misconception that poor countries cause more damage to environment at g7sakal
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जर्मनीतील श्लॉस एलमाऊ येथे झालेल्या G-7 शिखर परिषदेत भाग घेतल. दरम्यान परिषद सुरू होण्यापूर्वी पीएम नरेंद्र मोदींनी अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली आणि त्यानंतर शिखर परिषदेच्या पहिल्या सत्राला संबोधित देखील केले. आपल्या भाषणा दरम्यान पंतप्रधान मोदींनी गरीब देश पर्यावरणाचे जास्त नुकसान करतात हा गैरसमज आहे, असे जागतिक देशांना सुनावलं.

G-7 शिखर परिषदेचे पहिले सत्र हवामान बदल, ऊर्जा आणि आरोग्याशी संबंधित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचा 1000 वर्षांहून अधिक वर्षांचा इतिहास या गैरसमज किंवा दृष्टिकोनाचे पूर्णपणे खंडन करतो. भारताने पर्यावरणाप्रती आपली बांधिलकी कधीही कमी पडू दिली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जगातील 17 टक्के लोकसंख्या भारतात राहते, मात्र जागतिक कार्बन उत्सर्जनात भारताचे योगदान केवळ 5 टक्के आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आमची जीवनशैली.

पीए मोदी म्हणाले की, ऊर्जा ही केवळ श्रीमंतांचा विशेषाधिकार नसावा, तर एका गरीब कुटुंबाचाही उर्जेवर समान अधिकार असतो. आम्ही भारतात घरोघरी एलईडी बल्ब आणि स्वच्छ स्वयंपाकाचा गॅस पोहोचवला आहे आणि गरिबांसाठी देखील उर्जेचे पर्याय उपलब्ध करत अनेक दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन टाळता येऊ शकते हे दाखवून दिले आहे.

pm modi said there misconception that poor countries cause more damage to environment at g7
सोनिया गांधींच्या स्वीय सचिवावर बलात्काराचा गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आमच्या कामगिरीवरून हवामान बदलांप्रती आमची बांधिलकी स्पष्ट होते. 9 वर्षांपूर्वी आम्ही 40 टक्के ऊर्जा क्षमतेचे लक्ष्य गाठले होते. यासह, आम्ही पाच महिने आधीच पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठले आहे. पीएम मोदींनी सांगितले की, भारतात जगातील पहिले पूर्णपणे सौर उर्जेवर चालणारे विमानतळ आहे तसेच भारताची विशाल रेल्वे व्यवस्था या दशकात नेट झिरो टारगेट गाठेल. तसेच आम्हाला आशा आहे की, G-7 मधील समृद्ध देश भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देतील असेही मोदी म्हणाले.

pm modi said there misconception that poor countries cause more damage to environment at g7
G7 परिषद : PM मोदींना भेटण्यासाठी बायडन यांनी केली घाई; व्हिडिओ व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com