PM मोदींनी इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनींशी केली फोनवरून चर्चा, काय आहे कारण?

PM Modi Speaks To Giorgia Meloni: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी बोलले आणि इटलीने आज आपला मुक्ति दिन साजरा केला म्हणून शुभेच्छा दिल्याची माहिती दिली आहे.
PM Modi Speaks To Giorgia Meloni
PM Modi Speaks To Giorgia MeloniEsakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (गुरुवारी) इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. इटलीच्या मुक्ती दिनानिमित्त पंतप्रधानांनी मेलोनी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेलोनी यांना या वर्षी जूनमध्ये होणाऱ्या G7 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट केली आहे, "इटलीने आज आपला मुक्ति दिन साजरा केल्यामुळे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी बोललो आणि त्यांचे अभिनंदन केले."

PM Modi Speaks To Giorgia Meloni
गर्लफ्रेंडच्या बर्गरचा एक घास मित्राने खाल्ला; त्याचं डोकं सटकलं अन् उचललं टोकाचं पाऊल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी इटलीला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. इटलीतील G7 शिखर परिषदेसाठी भारताला आमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी आभार मानले. दोन्ही नेत्यांनी धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याबाबत त्यांच्या विचारांचा पुनरुच्चार केला. त्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली आहे.

PM Modi Speaks To Giorgia Meloni
India-China: चीनची कुरापत थांबेना! थेट POK मधेच बांधतोय रस्ता, सॅटेलाईट इमेजमधून खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या वर्षी जूनमध्ये इटलीमध्ये होणाऱ्या G7 शिखर परिषदेच्या आउटरीच सत्रात सहभागी होण्यासाठी जॉर्जिया मेलोनी यांनी आमंत्रित केले आहे.

G20 निकालांवर चर्चा

पंतप्रधान मोदींनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी बोललो आणि इटलीला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जूनमध्ये होणाऱ्या G7 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. G7 ने भारतात आयोजित G20 चे निकाल पुढे नेण्यावर चर्चा केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com