PM Modi Egypt Visit : भारतासाठी सुएझ कालवा किती महत्त्वाचा आहे?

सुएझ कालव्याचा आंतरराष्ट्रीय जलमार्ग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
PM Modi Egypt Visit
PM Modi Egypt Visitesakal

PM Modi Egypt Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा इजिप्त दौरा त्यांच्या अमेरिका दौऱ्यानंतरही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या होणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या भेटीपूर्वी इजिप्तने म्हटले आहे - ते भारताला सुएझ कालव्याच्या आर्थिक क्षेत्रात विशेष स्थान देतील. किंबहुना, इजिप्तला सुएझ कालव्याच्या आर्थिक क्षेत्रातही भारताकडून गुंतवणुकीची अपेक्षा आहे.

दोन्ही देशांमधील चर्चेत सुएझ कालवा हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. सुएझ कालव्याचा आंतरराष्ट्रीय जलमार्ग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गाने दररोज 500,000 बॅरल कच्चे तेल भारतात पाठवले जाते. याशिवाय जगातील अनेक देशांसोबत भारताची आयात-निर्यातही या जलमार्गाद्वारे होते, जी अत्यंत सोपी आणि कमी खर्चिक मानली जाते.

पण सुएझ नेमका आहे तरी काय?

तर भूमध्य समु्द्र आणि लाल समुद्राला जोडण्यासाठी १९ व्या शतकात हा कालवा बांधण्यात आला. या कालव्याच्या बांधकामाची चर्चा सर्वत्र केली जाते. या कालव्याचा इतिहास रंजक आहे.

इजिप्तमध्ये फ्रान्सचे माजी राजदूत फर्डिनेंड डी लेसीप यांनी इजिप्तच्या ऑटोमन गर्व्हनर यांच्यासोबत १८५४ मध्ये एक करार केला होता. त्यासाठी इस्थमस ऑफ सुएझवर १०० मैल लांबीचा कालवा बांधण्याचा प्रस्ताव होता. यासाठी अभियंत्यांच्या आंतरराष्ट्रीय टीमने नियोजन केले आणि १८५६ मध्ये सुएझ कालवा कंपनी तयार करण्यात आली. कालवा बांधण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही ९९ वर्षापर्यंत कालव्यातील वाहतूक संचलित करण्याचा अधिकार या कंपनीला देण्यात आला.

PM Modi Egypt Visit
PM Modi Egypt Visit : अमेरिकेनंतर पंतप्रधान मोदी थेट इजिप्तच्या दौऱ्यावर; दोन्ही देशांमधील व्यापाराच्या दृष्टीने करणार चर्चा

हाताने बांधला कालवा

या कालव्याचे बांधकाम एप्रिल १८५९ मध्ये सुरू करण्यात आले. त्यावेळी फारशी यांत्रिकी साहित्य, उपकरणे नव्हती. त्यामुळे कामगारांनी हाताने या कालव्याचे बांधकाम केले. त्यानंतर युरोपमधून आलेल्या कामगारांकडे चांगली उपकरणे होती. कालव्याचे बांधकाम सुरू असताना कॉलराची साथ पसरली होती. अखेर वर्ष १८६९ मध्ये या कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले. बांधकाम सुरू करताना कालवा २५ फूट खोल आणि ७२ फूट रुंद होता. वर्ष १८७६ मध्ये हा कालवा आणि चांगल्याप्रकारे बांधण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर या कालव्यातून जलवाहतूक मोठ्या प्रमाणावर होऊ लागली.

कालव्याची मालकी बदलत राहिली

वर्ष १८७५ मध्ये ग्रेट ब्रिटन हा सुएझ कालवा कंपनीचा सर्वात मोठा शेअरहोल्डर होता. त्यावेळी त्यांनी ऑटोमन गर्व्हनरकडून सगळे शेअर खरेदी केले. सात वर्षानंतर १८८२ मध्ये ब्रिटनने इजिप्तवर ताबा मिळवला. वर्ष १९३६ मध्ये इजिप्त स्वतंत्र झाला. मात्र, कालव्याचा अधिकार ब्रिटनकडे कायम होता. दुसऱ्या महायुद्धानंतर इजिप्तने कालवा झोनमधून ब्रिटीश सैनिकांपासून स्वातंत्र्याची मागणी केली. जुलै १९५६ मध्ये इजिप्तचे राष्ट्रपती जमाल अब्देल नसर यांनी कालव्याचे राष्ट्रीयकरण केले. टोलच्या माध्यमातून नाईल नदीवर बांधण्यात आलेल्या मोठ्या धरणाचा खर्च भागवता येईल असा त्यांचा होरा होता.

PM Modi Egypt Visit
PM Modi Egypt Visit: पंतप्रधान मोदी इजिप्तच्या अल हकीम मशिदीला भेट देणार, मोदींनी आतापर्यंत किती मशिदींना भेट दिलीय?

...आणि शांतता परतली

त्यानंतर इस्रायलने हल्ला केला आणि ब्रिटीश आणि फ्रेंच सैनिकांनी कालवा परिसराचा ताबा घेतला. संयुक्त राष्ट्र संघाच्या दबावानंतर त्यांना माघार घ्यावी लागली. इजिप्तने पुन्हा एकदा कालव्यावर नियंत्रण मिळवले आणि व्यापार जलवाहतुकीसाठी हा कालवा सुरू केला. दहा वर्षानंतर इजिप्तने हा कालवा बंद आणि पुढील आठ वर्षांपर्यंत इजिप्त आणि इस्रायलच्या सैन्यांमध्ये फ्रंटलाइन म्हणून हा कालवा होता. अखेर १९७५ मध्ये इजिप्तचे राष्ट्रपती अनवर अल-सादत यांनी शांततेचे प्रतिक म्हणून कालवा पुन्हा एकदा वाहतुकीसाठी सुरू केला.

PM Modi Egypt Visit
PM Modi Visit To Egypt: पंतप्रधान मोदींच्या इजिप्त दौऱ्याने अमेरिकेचं टेन्शन वाढणार?

भारतासाठी सुएझ कालवा किती महत्त्वाचा आहे?

युरोपीय देशांशी भारताचे जुने आणि चांगले व्यापारी संबंध आहेत. परंतु आफ्रिकन खंडामुळे दोन्ही प्रदेशांमधील सागरी मार्गाने वाहतुकीचा मार्ग लांबला. यात खूप वेळ जाऊ लागला. पण सुएझ कालवा उघडल्यानंतर ब्रिटन आणि भारतातील अंतर सुमारे साडेचार हजार मैलांनी कमी झाले.

सुएझ कालव्यामुळे भारत आणि युरोपीय देशांमधील अंतर 7000 किमीने कमी झाले. भारतातील अनेक व्यवसाय सागरी जहाजांद्वारे चालतात, यामध्ये कच्चे तेल, सोने, कोळसा, घन इंधन, हिरे आणि यांत्रिक उपकरणे, विशेष धातू, सेंद्रिय रसायने, प्लास्टिक, लोह आणि पोलाद इत्यादींचा समावेश होतो. सुएझ कालव्यामुळे भारताला पाश्चिमात्य देशांसोबत आयात-निर्यातीत बरीच सोय होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com