इंदापूरचं राजकारण तापलं; सुप्रिया सुळेंचं हर्षवर्धन पाटलांना थेट आव्हान (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

इंदापुरच्या जागेवरून राजकारण चांगलंच तापलं असून खा. सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांना थेट आव्हान दिले आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या दगाबाजीच्या आरोपाचे पुरावे द्यावेत. हर्षवर्धन पाटील यांचे भाषण ऐकले नाही पण माध्यमातील बातम्या ऐकून दुःख झाले असल्याचेचेही सुळे यांनी सांगितले आहे.

पुणे : इंदापुरच्या जागेवरून राजकारण चांगलंच तापलं असून खा. सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांना थेट आव्हान दिले आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या दगाबाजीच्या आरोपाचे पुरावे द्यावेत. हर्षवर्धन पाटील यांचे भाषण ऐकले नाही पण माध्यमातील बातम्या ऐकून दुःख झाले असल्याचेचेही सुळे यांनी सांगितले आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्या बचावासाठी बाळासाहेब थोरात आले पुढे...

सध्या इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विद्यमान आमदार असल्याचने असल्याने राष्ट्रवादी ही जागा सोडणार नाही, अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याने पाटील यांनी बुधवारी कार्यकर्ता मेळावा घेऊन राष्ट्रवादीवर आणि पवारांवर विश्वासघातकीपणाचा आणि दगाबाजपणाचा आरोप केला होता. यावर खा. सुप्रिया सुळे यांनी पाटील यांना खुले आव्हान दिले.

इंदापूरबाबत शरद पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा

हर्षवर्धन पाटील यांच्या मेळाव्यानंतर मी त्यांना अनेकदा कॉल केला परंतू त्यांचा फोन लागत नाही, असंही सुळे यांनी सांगितलं. त्यांना आता एका जबाबदार व्यक्तीकडे निरोप दिला असून तो निरोप त्याच्यापर्यंत पोहोचेल अशाच व्यक्तीकडेच निरोप पाठवला असल्याचे सुळे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीला धक्का; तटकरेंचा राजीनामा

तसेच, नेते पक्षांतर करत असलेल्या प्रश्नवारही त्यांनी उत्तर दिले असून ते कधीच सोडून गेलेले नेते कधीच राष्ट्रवादीचा आधार नव्हते. ते फक्त आमचे नेते होते असे म्हटले आहे. सोबतच पवारांना फक्त मुलगीच आहे या त्यांच्या जुन्या वाक्याची आठवण करुन देत त्यांनी आता फक्त मुलांचा प्रवेश होतो वडिलांना नकार मिळतो, असा टोलाही त्यांनी लावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya Sules direct challenge to Harshvardhan Patil on indapur seat