अफगाणिस्तानात पोलिओ लसीकरण सुरू

९१ लाख मुलांना डोस देणार; कोरोनामुळे मोहिमेला फटका
Polio vaccination begins Afghanistan
Polio vaccination begins Afghanistansakal

काबूल: अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने देशभरातील ९१ लाख मुलांसाठी पोलिओ लसीकरण मोहीम कालपासून सुरू केली आहे. चालू वर्षातील दुसरी मोहीम असून यानुसार पाच वर्षापेक्षा कमी वयोगटातील ९१ लाख मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे.कोरोनामुळे पोलिओ लसीकरण मोहिमेला अडथळे आल्याने हा आजार फैलावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Polio vaccination begins Afghanistan
ब्रिटनचा युक्रेनला पाठींबा; म्हणाले, शस्त्र तसेच संरक्षणात्मक मदत देऊ

दरम्यान बामियान, दयाकुंडी आणि घोरसह अन्य प्रांतात तसेच गझनी आणि बदख्शांच्या काही जिल्ह्यात थंडीची लाट असल्याने तेथे पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार नसल्याचे अफगाणिस्तानने म्हटले आहे. तीन दिवस राबवण्यात येणारी मोहीम युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने सुरू आहे. एका निवेदनानुसार, नवीन वर्षात पोलिओचा एक रुग्ण आढळून आला असून २०२१ मध्ये एकूण चार रुग्ण आढळून आले होते. जगात केवळ अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात पोलिओचे रुग्ण आढळून येत असल्याचे चित्र आहे. यूनिसेफच्या मते, अफगाणिस्तान पोलिओमुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असतानाही हा प्रश्‍न गंभीर बनला आहे. गेल्या तीन वर्षात पोलिओग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना लाटेमुळे पोलिओसारख्या अभियानावर परिणाम झाला आहे. तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध न झाल्याने पोलिओचे रुग्ण वाढले आहेत.

Polio vaccination begins Afghanistan
भारतीय प्रवाशांसाठी दुबईचा महत्वाचा निर्णय; पूर्व RT-PCR कोविड चाचणी रद्द

दक्षिण आफ्रिकेत पाच वर्षात पहिला रुग्ण

जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेतील मलावीची राजधानी लिलोंग्वे येथे एक लहान मुलीला पोलिओ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे देशात पोलिओ आणीबाणी लागू करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, आफ्रिकेत पाच वर्षापेक्षा अधिक काळानंतर पोलिओ संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला आहे. प्रयोगशाळेच्या चाचणीतून मलावीत आढळून आलेला पोलिओ हा पाकिस्तानात पसरलेल्या पोलिओशी संबंधित असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पाकिस्तानातील पोलिओ हा आता स्थानिक रोग म्हणून पसरला आहे.

ताएज (येमेन): अफगाणिस्तान, येमेन येथे पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जात आहे. येमेनचे तिसरे मोठे शहर ताएज येथे लहान मुलांना आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून पोलिओचा डोस देत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com