कॅनडा : कॅथलिक शाळांमधील मुलांवरील अत्याचाराबद्दल पोप मागणार माफी!

या महत्वाच्या कार्यक्रमासाठी पोप आठवडाभराच्या कॅनडा दौऱ्यावर रवाना
pop francis
pop francis

रोम : कॅथोलिक निवासी शाळांमध्ये कॅनेडिअन मुलांवरील अत्याचाराबद्दल ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस जाहीर माफी मागणार आहेत. यासाठी पोप प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देणार असून त्यासाठी ते रविवारी इटलीहून कॅनडासाठी रवाना झाले आहेत. ते आठवडाभार कॅनडाच्या दौऱ्यावर असतील. (Pope Francis to apologize for abuse of Canadian Indigenous children in Catholic residential schools)

कॅनडामध्ये कॅथलिक चर्चमध्ये मुलांवर अत्याचाराच्या घटना घडल्याचं गेल्या वर्षी समोर आल्यानं खळबळ उडाली होती. या घटनेबाबत माफी मागायला आपण तयार आहोत असं पोप फ्रान्सिस यांनी म्हटल्याचं वृत्त CNN नं दिलं आहे. यासाठी पोप रोमवरुन कॅनडाला रवाना झाले आहेत त्यांच्या या दौऱ्याला व्हॅटिकनने “पेशनीय तीर्थयात्रा” म्हटलं आहे. दरम्यान, एडमंटनमध्ये पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि कॅनडाचे गव्हर्नर जनरल मेरी सायमन यांच्या हस्ते पोपचं करतील. दरम्यान, फ्रान्सिस, गुडघेदुखीमुळं त्रस्त असल्यानं या महिन्यात आफ्रिकेचा दौरा रद्द करण्यात आला होता. त्यामुळं त्याच्या निवृत्तीबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

पोप यांचा असा असेल कार्यक्रम

कॅनडात पोहोचल्यानंतर पोप कॅनडातील स्थानिक ख्रिश्चन गटांना भेटी देतील आणि देशातील निवासी शाळांमधील होत असलेल्या गैरवापरांवर भाष्य करतील. दरम्यान, स्थानिक नेत्यांनी अनेक दशकांपासून स्थानिक मुलांवर अशा प्रकारे झालेल्या हानीबद्दल पोपची माफी मागितली आहे. या दौऱ्यादरम्यान पोप कॅनडाच्या नुनावुत प्रांताची राजधानी क्यूबेक आणि इकालुइट येथेही जाणार आहेत.

कॅनडात काय घडलं होतं?

गेल्या वर्षी ब्रिटिश कोलंबिया आणि सस्कॅचेवानमधील निवासी कॅथलिक शाळांच्या मैदानावर शेकडो कबरी सापडल्या होत्या. कॅनडातील सत्य आणि सामंजस्य आयोगानं याबाबतच्या नोंदी केल्या होत्या. यामध्ये 4,000 हून अधिक स्थानिक मुले निवासी शाळांमध्ये दुर्लक्षित राहिल्यानं आणि अत्याचारांमुळं मरण पावली, यांपैकी बऱ्याच शाळा या कॅथोलिक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com