कोरोनाच्या लसीच्या क्षमतेची तपासणी संगणकीय प्रारूपाचा वापर करून अमेरिकेच्या संशोधकांनी केली

पीटीआय
Sunday, 30 August 2020

कोरोनावरील लशीचा प्रभाव व या विषाणूंचा संपूर्णपणे निर्मूलन होण्यासाठी लसीच्या क्षमतेची तपासणी संगणकीय प्रारूपाचा वापर करून अमेरिकेच्या संशोधकांनी केली आहे. आगामी काळात लशीबद्दलच्या निर्णयात यातील व निष्कर्षांचा उपयोग होऊ शकतो.

न्यूयॉर्क - कोरोनावरील लशीचा प्रभाव व या विषाणूंचा संपूर्णपणे निर्मूलन होण्यासाठी लसीच्या क्षमतेची तपासणी संगणकीय प्रारूपाचा वापर करून अमेरिकेच्या संशोधकांनी केली आहे. आगामी काळात लशीबद्दलच्या निर्णयात यातील व निष्कर्षांचा उपयोग होऊ शकतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘अमेरिकन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन’ यामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. अमेरिकेत कोरोनावरील लशीवर संशोधन सुरू आहे. सुरक्षित अंतरासारख्या अन्य कोणत्याही उपायांविना कोरोनाचा संसर्गापासून बचाव करण्यासाठी या लशीच्या क्षमतेचे मूल्यमापन या नव्या पद्धतीने करण्यात आले आहे. या साथीची लाट थोपवणे किंवा ती नष्ट करण्यासाठी लशीचा क्षमता तपासणे हा या संशोधनाचा हेतू होता, असे अमेरिकेतील ‘सीयूएनवाय ग्रॅज्युएट स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ अँड हेल्थ पॉलिसी’ या संस्थेतील संशोधकांनी सांगितले.

कोरोना विषाणूचे उगमस्थान असलेल्या शहरातील शाळा अनलॉक होणार

परिणामकारकतेला महत्त्व
सीयूएनवाय ग्रॅज्युएट स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ अँड हेल्थ पॉलिसी’च्या संशोधनाचे सहलेखक ब्रुस वाय. ली म्हणाले की, कोरोनापासून मुक्ती मिळून पहिल्यासारखे सामान्य जीवन जगता यावे, यासाठी लस लवकरात लवकर आणण्याचा दबाव काही जण टाकत आहेत, पण आपण योग्य अपेक्षा लक्षात घ्यायला हव्यात. केवळ लस आली म्हणजे तुम्ही साथीच्या पूर्वीचे जीवन जगू शकाल, असे होणार नाही. कारण अन्य उत्पादनांप्रमाणेच केवळ लस उपलब्ध होणे महत्त्वाचे नाही तर त्याची परिणामकारकताही तपासली पाहिजे.

हॅरिस यांच्यापेक्षा इव्हांका राष्ट्राध्यक्षपदासाठी पात्र - डोनाल्ड ट्रम्प

प्रारूपाच्या वापरातून...

  • अंदाज वर्तविण्याऐवजी परिस्थिती कशी बदलेल, याचा अभ्यास.
  • सुरक्षित अंतराचा नियम शिथिल केला तर काय होऊ शकेल, हे दाखविण्याचे उद्दिष्ट्य.
  • जर ६० टक्के लोकांना लस दिली तर साथ रोखण्याची क्षमता ८० टक्के तर साथीच्या निर्मूलनासाठी लस १०० टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले.
  • लस ६० ते ८० टक्के प्रभावी असल्यास  विशिष्ट परिस्थित कोरोनाला रोखण्यासाठी अन्य उपायांची गरज भासू शकते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The potential of the corona vaccine was tested by US researchers using a computer model