
अमेरिका-भारत रणनीतिक भागीदारी वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारासाठी तसेच नेतृत्त्वासाठी त्यांना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सन्मानित केले आहे.
नवी दिल्ली- अमेरिका-भारत रणनीतिक भागीदारी वाढवण्यासाठी केलेल्या नेतृत्त्वासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लीजन ऑफ मेरिट ( Legion of Merit) पुरस्काराने सन्मानित केले आहे. अमेरिकेत भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांच्याकडून पंतप्रधान मोदींच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.
रॉबर्ट ओब्रायन यांनी टि्वटमध्ये म्हटले की, अमेरिका-भारत रणनीतिक भागीदारी वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारासाठी तसेच नेतृत्त्वासाठी त्यांना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सन्मानित केले आहे. त्यांच्या दृढ नेतृत्त्व आणि दूरदृष्टीमुळे हा पुरस्कार देण्यात आला आहे. मोदींनी जागतिक शक्तीच्या रुपात भारताला गती दिली आहे आणि जागतिक आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी अमेरिका आणि भारतादरम्यान रणनीतिक भागीदारी वाढवली आहे.
हेही वाचा- 'बाबा का ढाबा'वाले कांता प्रसाद बनले रेस्टॉरंटचे मालक
President Donald Trump presented the Legion of Merit to Indian PM Narendra Modi for his leadership in elevating the US-India strategic partnership. Indian Ambassador to US Taranjit Singh Sandhu accepted the medal on behalf of PM Modi: US National Security Advisor Robert C O'Brien pic.twitter.com/GP2DLMCpwY
— ANI (@ANI) December 22, 2020
ओब्रायन यांनी आपल्या दुसऱ्या एका टि्वटमध्ये म्हटले की, ट्रम्प यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानाचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनाही लीजन ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित केले आहे. हे पुरस्कार वॉशिंग्टन डीसी येथे त्या त्या देशांच्या राजदूतांना प्रदान करण्यात आले होते. ट्रम्प यांनी स्वतंत्र आणि खुले भारत-प्रशांत महासागरच्या नेतृत्त्व आणि व्हिजनसाठी मोदी, आबे यांना सन्मानित केले.