मोदींच्या भेटीत बायडेन यांनी काढली महात्मा गांधींची आठवण; म्हणाले, 'गांधींजी...'

मोदींच्या भेटीत बायडेन यांनी काढली महात्मा गांधींची आठवण; म्हणाले, 'गांधींजी...'

वॉशिंग्टन : पंतप्रधान मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून आज त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान मोदी यांनी व्हाईट हाऊसमध्ये बायडेन यांच्याशी संवाद साधला आहे. व्हाईट हाऊसमधील ओव्हल कार्यालयात ही द्विपक्षीय बैठक झाली असून सुमारे एक तास त्यांनी चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदी हिंदीत बोलत होते, तर दुभाषकाद्वारे त्यांनी बायडेन यांच्याशी संवाद साधला. या बैठकीत जो बायडेन यांनी महात्मा गांधींचा उल्लेख करत त्यांची जगाला गरज असल्याचं म्हटलंय.

मोदींच्या भेटीत बायडेन यांनी काढली महात्मा गांधींची आठवण; म्हणाले, 'गांधींजी...'
बायडेन यांना मोदी म्हणतात; 'दृढ मैत्रीची बीजे रोवली गेली आहेत'

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गांधीजींच्या जयंतीचा उल्लेख केला. तसेच गांधीजीच्या ट्रस्टीशीप म्हणजेच विश्वस्तपणाबद्दल बोलले. ते म्हणाले की, गांधीजींनी सांगितलेली ही एक अशी संकल्पना आहे, जी येत्या काळात जगासाठी अत्यंत महत्वाची असणार आहे, असंही मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यावेळी जो बायडेन यांना म्हणाले की, माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे भरभरून स्वागत केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. याआधी आम्हाला चर्चा करण्याची संधी मिळाली होती आणि त्यावेळी तुम्ही भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांची दृष्टी मांडली होती. आज, तुम्ही भारत-अमेरिका संबंधांसाठी तुमची दृष्टी अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेत आहात. पुढे ते म्हणाले की, आजची द्विपक्षीय शिखर परिषद महत्त्वाची आहे. आपण या शतकाच्या तिसऱ्या दशकाच्या सुरुवातीला भेटत आहोत. हे दशक कसे घडतंय त्यामध्ये तुमचे नेतृत्वाची नक्कीच महत्वाची भूमिका असेल. भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री आणखी मजबूत होण्यासाठी हे बीज पेरले जात आहे. तंत्रज्ञान एक प्रेरक शक्ती बनत आहे. मोठ्या जागतिक हितासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपल्या प्रतिभेचा वापर करावा लागेल, असं त्यांनी म्हटलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com