H-1B व्हिसाबाबत राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बायडेन यांची मोठी घोषणा

Presidential Candidate Joe Biden's Big Announcement on H-1B Visas
Presidential Candidate Joe Biden's Big Announcement on H-1B Visas

नवी दिल्ली- अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी H-1B व्हिसाबाबत मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत माझा विजय झाला तर H-1B व्हिसावरील निर्बंध उठवण्यात येतील, असं ते म्हणाले आहेत. कंपनीचा व्हिसा घेऊन आलेल्या लोकांचा या देशाच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. त्यामुळे मी अध्यक्ष झाल्यानंतरच्या 100 दिवसात H-1B व्हिसावरील निर्बंध उठवण्यासाठी आमच्या सरकारची प्राथमिकता असेल, असं बायडेन म्हणाले आहेत. 

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्षांच्या शेवटपर्यंत H-1B व्हिसावर बंदी आणली आहे. त्यानंतरही ही बंदी वाढवली जाण्याची शक्यता आहे. याचा सर्वात मोठा फटका भारतीयांना बसणार आहे. कारण H-1B व्हिसा घेउन अनेक भारतीय अमेरिकेत जात असतात. मात्र, व्हिसावरील निर्बंधामुळे या वर्षी तरी भारतीयांना अमेरिकेत जाता येणार नाही. 

चीनला मोठा झटका; संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 'या' दोन देशांनी...
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. यात रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेम्रोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे. ट्रम्प यांनी अमेरिकी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी स्थलांतरितांचा मुद्दा पुढे केला आहे. यातून त्यांनी काही दिवसांपूर्वी H-1B व्हिसावर बंदी आणल्याचे जाहीर केले होते. बायडेन यांनी मात्र ट्रम्प यांच्या अगदी उलट भूमिका घेतली आहे. राष्ट्रपतीपदी विराजमान होताच त्यांनी H-1B व्हिसावरील निर्बंध उठवण्याचे वचन दिलं आहे. त्यामुळे जो बायडेन सत्तेत आले तर H-1B व्हिसा घेऊन अमेरिकेत येऊ पाहणाऱ्यांचा फायदा होणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसावर डिसेंबरपर्यंत बंदी आणली आहे. मात्र, माझ्या सरकारमध्ये असे होणार नाही. H-1B व्हिसा घेऊन उच्च कौशल्याच्या व्यक्ती अमेरिकेत येत असतात. अशा स्थलांतरितांमुळे अमेरिकेने प्रगती केली आहे. त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता आली तर स्थलांतरितांसाठी एक रोडमॅप तयार केला जाईल. त्याने अनेक स्थलांतरितांना अमेरिकेत सामावून घेणे शक्य होईल. विविधता हे अमेरिकेचे वैशिष्ठ आहे, असं बायडेन म्हणाले आहेत.

हाँगकाँगमध्ये स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी हाँगकाँग प्रशासनाने घेतला निर्णय
दरम्यान, अमेरिकेकडून दरवर्षी 85000 H-1B व्हिसा जारी केले जातात. अनेक देशातील उच्च शिक्षित आणि उच्च कौशल्य असणाऱ्या व्यक्ती या व्हिसावर अमेरितेत येतात. H-1B व्हिसा घेऊन अमेरिकेत येणाऱ्यात भारतीयांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे H-1B व्हिसावरील निर्बंध हटवले तर भारतीयांना त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com