कोरोनाची झळ ब्रिटनच्या राजघराण्यालाही; कोणाला झाली लागण?

वृत्तसंस्था
बुधवार, 25 मार्च 2020

आतापर्यंत इंग्लंडमधील ८ हजारहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४२२ ब्रिटिश नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

लंडन : जगभरात दहशत माजवणाऱ्या कोरोना व्हायरसने आता ब्रिटनच्या राजघराण्यातही प्रवेश केला आहे. सर्वसामान्य नागरिक कोरोनाच्या विळख्यात अडकल्यानंतर आता राजघराण्यातील व्यक्तीही कोरोनाच्या तावडीतून सुटली नाही. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ब्रिटनच्या राजघराण्यातील व्यक्तीला कोरोना झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली असून इंग्लंडमध्ये खळबळ उडाली आहे. युवराज चार्ल्स यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, या संसर्गाची लक्षणे सौम्य असून त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती अधिकृत प्रवक्त्याने दिली. 

- Coronavirus : पाकिस्तान कोरोनाच्या विळख्यात; रुग्णांची संख्या पोहोचली...

युवराज चार्ल्स हे ७१ वर्षांचे आहेत. प्रिन्स चार्ल्स यांच्या पत्नी आणि कॉर्नवॉलच्या डचेस कॅमीला यांचीही कोरोना टेस्ट घेण्यात आली. मात्र त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. या दोघांचे स्कॉटलंडमधील बॅल्मोरलमध्ये विलगीकरण करण्यात आले आहे. 

- भूकंपाच्या धक्क्याने रशिया हादरले; त्सुनामीचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून युवराज चार्ल्स घरी नेहमीची कामे करत आहेत. त्यांना कोरोनाची लागण कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण अलीकडच्या काही आठवड्यांत ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. तसेच काही दिवसांपूर्वी प्रिन्स चार्ल्स यांनी मोनॅकोचे प्रिन्स अल्बर्ट यांची भेट घेतली होती. आता प्रिन्स अल्बर्ट यांनाही कोरोना झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले आहे. 

- Big Bazaar चा मोठा निर्णय; लॉकडाऊनमध्ये घरपोच मिळणार धान्य आणि भाज्या...

इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांची या आधीच बर्मिंगहम पॅलेसमधून विंडसर येथील राजवाड्यात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी तीन आठवड्यांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा केली आहे. 

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आतापर्यंत इंग्लंडमधील ८ हजारहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४२२ ब्रिटिश नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prince Charles tests positive for novel coronavirus but remains in good health