बदललेलं आडनावही मुलांना देऊ शकले नाहीत Prince Philip

queen elizabeth duke of edinbergh prince philip
queen elizabeth duke of edinbergh prince philip
Updated on

लंडन - ब्रिटनच्या महाराणी प्रिन्स फिलीप यांचे शुक्रवारी निधन झाले. ग्रीक राजघराण्यात जन्म झालेल्या प्रिन्स फिलीप यांची ओळख संयमी आणि निष्ठावान अशीच होती. ग्रीकमध्ये 10 जून 1921 रोजी फिलीप यांचा जन्म कोर्फू बेटावर झाला. त्यांचे वडील प्रिन्स अँड्रूय हे ग्रीकच्या हेलेनेसचे राजे पहिले जॉर्ज यांचे धाकटे पुत्र होते. तर आई ही बर्माच्या अर्ल माउंटबॅटनची बहीण. फिलीप यांच्या जन्मानंतर एका वर्षाने ग्रीकमध्ये बंड झालं आणि त्यांच्या वडिलांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं. त्यांना ग्रीकमधून बाहेर पडावं लागलं. तेव्हा त्यांचे कुटुंबिय फ्रान्सला आले. 

नेव्हल कॉलेजमध्ये 13 वर्षीय एलिझाबेथशी भेट
फिलीप हे त्यांच्या भावंडात सर्वात लहान आणि एकुलता एक मुलगा होते. त्यामुळे कुटुंबात थोडं लाडात वाढले. फ्रान्समध्ये सुरुवातीचं शिक्षण झाल्यानंतर पुढचं प्राथमिक शिक्षण इंग्लंडमध्ये झालं. 1933 ला त्यांना जर्मनीत शिक्षणासाठी पाठवलं. त्यांनी पुढचं शिक्षण स्कॉटलंडमध्ये घेतलं. जर्मनीत नाझींकडून होणारे अत्याचार त्यांनी पाहिले होते. त्याचवेळी त्यांनी लष्करात जाण्याचा निश्चय केला. फिलीप यांनी ब्रिटानिया रॉयल नेव्हल कॉलेज डार्टमथ इथं प्रवेश घेतला. राजे सहावे जॉर्ज यांनी जुलै १९३९ मध्ये या नौदल अकादमीला भेट दिली. त्यावेळी जॉर्ज यांच्या मुलींना, एलिझाबेथ आणि मार्गारेट यांची काळजी घेण्याचे काम फिलीप यांच्याकडे होते. त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा एलिझाबेथ यांच्यावर प्रभाव पडला. तेव्हा प्रिन्सेस एलिझाबेथ 13 वर्षांच्या होत्या.

एलिझाबेथ यांच्याशी विवाहाआधी बदललं आडनाव
प्रिन्स फिलीप आणि प्रिन्सेस एलिझाबेथ यांच्यात पत्रव्यवहार दरम्यानच्या काळात सुरु होता. तसंच बऱ्याचदा फिलीप यांना शाही कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधीही मिळाली होती. त्याच काळात त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. त्यांच्या नात्याला काही मंडळींचा विरोधही होता. प्रिन्स फिलीप आणि एलिझाबेथ द्वितिय यांच्या साखरपुड्याची घोषणा करण्यापूर्वी किंग जॉर्ज सहावा यांनी काही अटी घातल्या होत्या. त्यामध्ये ग्रीक राजघराण्याचं पद सोडावं लागणार होतं आणि ब्रिटिश नागरिकत्व घ्यावं लागणार होतं. तसंच आडनावही बदलायचं अशी अट होती. तेव्हा फिलीप यांनी ग्रीक आणि डेन्मार्क राजघराण्याच्या वारशाचा त्याग केला आणि आईचं माउंटबॅटन हे आडनाव निवडलं. त्यानंतर किंग जॉर्ज सहावा यांनी फिलीपना 'हिज रॉयल हायनेस' हे पद त्यांना दिलं. तसंच विवाहावेळी 'ड्युक ऑफ एडिनबरा', 'अर्ल ऑफ मेरिओनेथ अँड बॅरॉन ग्रिनविच' अशा पदव्या मिळाल्या. एलिझाबेथ द्वितिय आणि प्रिन्स फिलीप यांचा विवाह 20 नोव्हेंबर 1947 रोजी पार पडला.

बदललेलं आडनावसुद्धा मुलांना देऊ शकले नाहीत
किंग जॉर्ज सहावा यांच्या निधनानंतर एलिझाबेथ महाराणी झाल्या. तेव्हा राज्याभिषेकाच्या आधी एलिझाबेथ यांनी घोषणा केली की, राणी एलिझाबेथ यांच्यानंतर प्रिन्स फिलीप यांना प्रत्येक समारंभात मान दिला जाईल. प्रिन्स फिलीप यांना एका गोष्टीचा मोठा धक्का बसला होता. तो म्हणजे आपल्या अपत्यांना स्वत:चं आडनाव देता येणार नाही याचा. राणी एलिझाबेथ यांनी मुलांना विंडसर हे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर आपली अवस्था अमिबासारखी झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. 

महाराणींना अखेरपर्यंत सोबत
ब्रिटिश राजघराण्यात आधुनिक काळानुरुप बदलामध्ये त्यांची भूमिका राहिली आहे. राणी एलिझाबेथ यांच्या पाठिशी राहण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं. महाराणींना राज्यकारभार नीट करता यावा यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. 2017 पासून त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणं बंद केलं होतं. महाराणी एलिझाबेथ यांनी प्रिन्स यांचे कौतुक करताना म्हटलं होतं की, प्रिन्स फिलीपना कौतुक ऐकायची सवय नाही. ते आतापर्यंत माझी शक्ती बनून राहिले आहेत. माझ्यासह शाही परिवार आणि देश त्यांचा ऋणी असेल. ७३ वर्षांच्या सहजीवनात राणी एलिझाबेथ यांनी, फिलीप हेच माझी प्रेरणा आणि ताकद असल्याचे वारंवार सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com