राजाची कविता घटस्फोटास कारणीभूत? प्रिन्सेसला 5540 कोटींची पोटगी

दुबईचे राजे शेख मोहम्मद यांना सहाव्या पत्नीला घटस्फोटानंतर पोटगी म्हणून ५ हजार ५४० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
Sheikh Of Dubai and Princess Haya
Sheikh Of Dubai and Princess Haya
Summary

दुबईचे राजे शेख मोहम्मद यांना सहाव्या पत्नीला घटस्फोटानंतर पोटगी म्हणून ५ हजार ५४० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन रशिद अल-मख्तून (Sheikh Of Dubai) आणि प्रिन्सेस हया बिंत अल-हुसेन (Princess Haya) यांचा घटस्फोट सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक ठरला आहे. राजे शेख मोहम्मद हे पोटगीची रक्कम म्हणून तब्बल ५ हजार ४०० कोटींहून अधिक रक्कम प्रिन्सेस हया यांना देणार आहेत. युकेच्या न्यायालयाने घटस्फोटावर सुनावणी करताना पोटगीची रक्कम देण्याचे आदेश राजे शेख मोहम्मद यांना दिले आहेत. शेख मोहम्मद बिन रशिद हे युएईचे पंतप्रधानसुद्धा आहेत.

प्रिन्सेस हया दोन वर्षांपूर्वीच त्यांच्या मुलांसह ब्रिटनमध्ये गेल्या होत्या. आपल्यासह मुलांच्या जीवाला धोका असल्याचं कारण त्यांनी सांगितलं होतं. कायदेशीर लढाई सुरु झाल्यानंतर राजघराण्यातील ही कुरबूर समोर आली होती. त्यातच शेख मोहम्मद यांनी शेखा लतिफा आणि शेखा शमसा या त्यांच्या दोन्ही मुलींचे अपहऱण करून दुबईला नेलं होतं. यामुळे प्रिन्सेस हया यांना आपल्या मुलांचेही असेच अपहरण होईल अशी भीती होती.

७२ वर्षांच्या शेख मोहम्मद यांनी प्रिन्सेस हया यांनी केलेले अपहरणाचे आरोप फेटाळून लावले होते. मात्र गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने या आरोपात तथ्य असण्याची शक्यता वर्तवली होती. दरम्यान, यात प्रिन्सेस हया यांचे माजी लष्करी सुरक्षा रक्षकासोबत संबंध असल्याची चर्चा झाली होती. यानंतर राजे शेख मोहम्मद यांनी लिहिलेली कविता एक प्रकारे धमकीच होती असं प्रिन्सेस हया यांना वाटत होतं. शेख मोहम्मद यांनी You Lived, You Died अशी कविता लिहिली होती.

Sheikh Of Dubai and Princess Haya
दुबईच्या राजाचा महागडा घटस्फोट; पोटगीत द्यावे लागणार ५५४० कोटी

प्रिन्सेस हया या ब्रिटनला गेल्यानंतर त्यांना धमक्या येत होत्या. त्यात आम्ही कुठेही पोहचू शकतो असाच मेसेज दिला जात असे. मुलांच्या अपहऱणाची भीती प्रिन्सेसला असल्यानं त्यासाठी मोठा खर्च प्रिन्सेस हया यांनी केला. शेख मोहम्मद हे प्रिन्सेस हया यांच्यासह सुरक्षा रक्षक आणि कायदेशील सल्लागार टीमचे फोन टॅप करत असल्याचा आरोपही प्रिन्सेस हया यांनी केला होता. पण हे सर्व आरोप राजे शेख मोहम्मद यांनी फेटाळून लावले होते. मात्र न्यायालयाने घटस्फोटाचा निकाल देताना म्हटलं की, प्रिन्सेस हया यांच्यासह मुलांच्या जीवाला धोका आहे. त्यांना सुरक्षेची गरज आहे आणि मुलांना असलेला धोका इतर कोणाकडून नाही तर त्यांच्या वडिलांकडूनच असल्याचंही निकालात नमूद केलं आहे.

प्रिन्सेस हया या जॉर्डनचे माजी राजे हुसैन यांची कन्या आहेत. हया यांचा २००४ मध्ये शेख मोहम्म यांच्याशी विवाह झाला होता. प्रिन्सेस हया यांना धमकी म्हणून ज्या कवितेचा उल्लेख केला जातो ती ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून हटवली जाणार आहे. हया यांना कोणतीही इजा पोहोचवण्याचा उद्देश नसल्याचं शेख मोहम्मद यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com