
चीनमध्ये एससीओ परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहिले आहेत. व्लादिमीर पुतीन हे त्यांच्या ऑरस लिमोजीन कारसही चीनमध्ये दाखल झालेत. पुतीन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोबत घेत ऑरस कारमधून प्रवास केला. एससीओ समिटपासून इतर द्विपक्षीय बैठकीच्या ठिकाणापर्यंत दोघांनी एकाच कारमधून प्रवास केला.