पुतीन यांना मोठा झटका, युनोतील रशियन अधिकाऱ्याने दिला राजीनामा

पुतीन यांना मोठा झटका
Russian President Vladimir Putin
Russian President Vladimir Putin Sakal

जीनिव्हा : जीनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रातील एक राजनयिक अधिकाऱ्याने युक्रेनवरील आक्रमण लज्जास्पद असल्याचे सांगून सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. रशियन राजनयिक बोरिस बोंडारेव म्हणाले, की त्यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन (Vladimir Putin) यांनी युक्रेनमध्ये युद्ध छेडल्याबद्दल परदेशी मित्रांना पत्र पाठवण्यापूर्वी आपला राजीनामा सुपुर्द केला आहे. रशियन (Russia) मिशनला सोमवारी सकाळी प्राप्त झालेल्या एका पत्रात बोरिस यांनी राजीनामा दिल्याच्या म्हटले आहे. युक्रेनवर रशियन हल्ल्याच्या तारखेचा उल्लेख करत बोरिस लिहितात, माझ्या २० वर्षांच्या राजनयिक जीवनात मी परराष्ट्र धोरणात अनके बदल पाहिले. (Putin's Diplomat Officer Resigns From UN Geneva For Ukraine War)

Russian President Vladimir Putin
सुब्रमण्यम स्वामींचा PM वर हल्ला; ट्विटरवर मोदी व माझ्यात फरक एवढाच की...

मात्र मला या वर्षी २४ फेब्रुवारी पूर्वी कधी आपल्या देशाविषयी इतके लाज वाटले नव्हते. ते म्हणाले, पुतिनद्वारा युक्रेनविरुद्ध सुरु असलेले युद्ध हे पूर्ण पाश्चात्य देशांविरुद्ध छेडले गेले. हे केवळ युक्रेनियन नव्हे तर रशियाच्या लोकांविरुद्ध एक गंभीर अपराध आहे. रशियाने या वर्षी २४ फेब्रूवारी रोजी युक्रेनवर हल्ले करण्यास सुरुवात केले होते. फोनवरुन रशियन राजनयिक बोरिस यांनी आपण राजीनामा दिल्याचे सांगितले. ते म्हणाले राजदूत गेन्नेडी गॅटिलोव यांना आपला राजीनामा सुपुर्द केला आहे.

Russian President Vladimir Putin
पैसे देऊन लोकांना मोर्चाला आणले, अंबादास दानवेंचा भाजपवर आरोप

बोरिस म्हणाले, आता माझे सरकार जे करत आहे, ते सहनशीलतेच्या बाहेर गेले आहे. सरकारी कर्मचारी असल्याने माझीही जबाबदारी असेल आणि मी त्यासाठी तयार नाही. राजीनामा दिल्यानंतर आतापर्यंत रशियन अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेले नसल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे मिशनचे प्रवक्त्याशी याबाबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com