esakal | दुर्मिळ शिवमूर्ती पुन्हा भारतात; नवव्या शतकातील मूर्ती गेली होती चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

Ghateshwar-Idol

भारतातून चोरी करून विदेशात नेलेली नवव्या शतकातील दगडी शिवमूर्ती भारतीय पुरातत्व खात्याला परत मिळाली आहे. जटामुकुट, त्रिनेत्र असलेली जवळपास चार फूट उंचीची ही ‘नटेशा’ मूर्ती १९९८ मध्ये राजस्थाममधील बारोली गावातील घटेश्‍वर मंदिरातून चोरीला गेली होती. तस्करांनी ती ब्रिटनला नेऊन विकल्याचे २००३ ला उघड झाले. 

दुर्मिळ शिवमूर्ती पुन्हा भारतात; नवव्या शतकातील मूर्ती गेली होती चोरी

sakal_logo
By
पीटीआय

लंडन - भारतातून चोरी करून विदेशात नेलेली नवव्या शतकातील दगडी शिवमूर्ती भारतीय पुरातत्व खात्याला परत मिळाली आहे. जटामुकुट, त्रिनेत्र असलेली जवळपास चार फूट उंचीची ही ‘नटेशा’ मूर्ती १९९८ मध्ये राजस्थाममधील बारोली गावातील घटेश्‍वर मंदिरातून चोरीला गेली होती. तस्करांनी ती ब्रिटनला नेऊन विकल्याचे २००३ ला उघड झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भगवान शंकराची ही प्रतिहार शैलीत तयार केलेली मूर्ती दुर्मिळ आहे. मूर्तीच्या तस्करीबाबत लक्षात आल्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी ब्रिटनमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांच्या सहकार्याने मूर्तीचा ताबा असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधण्यात आला होता.

अमेरिकेतील मृतांची संख्या दीड लाखांहून अधिक

Edited By - Prashant Patil