Nobel Prize 2019 :...यामुळे मिळाले वैद्यकशास्त्रातील नोबेल!

Nobel-2019-Medicine
Nobel-2019-Medicine

पुणे : 'प्राणवायूच्या उपलब्धतेचा अंदाज आणि तो ग्रहण करण्याची पेशींची क्षमता' यावर केलेल्या संशोधनाबद्दल अमेरिकेचे पेशीसंशोधक विल्यम केलिन, ग्रेग सेमेन्झा आणि ब्रिटनचे पीटर रॅटक्‍लिफ यांना 2019 चे वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर झाले आहे. 

''प्राणवायूची शरीरातील मात्रा ही कशाप्रकारे पेशी, चयापचय क्रिया आणि शारीरिक हालचालींवर परिणाम करते, हे आपल्याला समजून घेता यावे, यासाठी या संशोधनाचा उपयोग होईल. या संशोधनामुळे रक्तक्षय, कर्करोग आणि इतर आजारांशी लढा देण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होऊ शकेल. प्राणवायूची (ऑक्‍सिजन) मात्रा बदलल्यानंतर त्याचा जनुकांद्वारे कसा प्रतिसाद दिला जातो आणि ती प्रक्रिया कशी नियंत्रित केली जाते, याचीही माहिती केलिन, सेमेन्झा आणि रॅटक्‍लिफ यांच्या संशोधनामुळे मिळू शकली आहे,'' असे पुरस्कार समितीने म्हटले आहे. 

प्राणवायूच्या पेशींमधील उपलब्धतेच्या माहितीच्या आधारे विविध रोगांवरील औषधे विकसित करण्यासाठी विविध प्रयोगशाळा आणि औषध निर्माण कंपन्यांना या तिघांच्या संशोधनाने चालना मिळेल, असे पुरस्कार समितीने नमूद केले आहे. 

काय आहे संशोधन?

उती अथवा पेशींमध्ये ऑक्‍सिजनचे प्रमाण सामान्य असते, तेव्हा 'हायपोक्‍सीया इनड्यूसिबल फॅक्‍टर' (एचआयएफ) घटण्यास सुरवात होते. त्यामुळे लाल रक्त पेशींची निर्मिती आणि रक्त वाहिन्यांची वाढीद्वारे ऑक्‍सिजनचे वितरण वाढविणाऱ्या जनुकांचा स्थिर ठेवते.

जेव्हा पेशींमध्ये पुरेसा ऑक्‍सिजन नसतो, तेव्हा एचआयएफ स्थिर होते आणि जनुकांना कार्य करण्यास परवानगी देते. 'एचआयएफ'ची घट करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारचे प्रथिने कारणीभूत असल्याचे वैज्ञानिकांच्या लक्षात आले आहे, पण खरा प्रश्‍न असा आहे. पेशींमध्ये ऑक्‍सिजन कमी आहे, असे या प्रथिनाला कसे कळते आणि तो लगेच 'एचआयएफ'ला एकटे सोडून बाजूला कसा होतो, हे कोडे सोडविणे अवघड होते. 

अमेरिकेतील विल्यम केलिन, ग्रेग सेमेन्झा यांनी नेमके याच कोड्याचे उत्तर शोधले. त्यांच्या लक्षात आले की, जर प्रोटीनमधील अमिनो ऍसिडच्या रासायनिक संरचनेत एखादा हायड्रॉग्झील ग्रुप (म्हणजे एक ऑक्‍सिजन आणि एक हायड्रोजन यांची जोडी) जोडला गेला, तर ही ऑक्‍सिजन ओळखण्याची गुंतागुंतीची रासायनिक प्रक्रिया पार पडते. 

संशोधकांची ओळख :-

विल्यम केलिन :

न्यूयॉर्क येथे 1957 साली जन्मलेले केलिन हे अमेरिकेत हॉवर्डमधील ह्युजेस मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहेत. 2001 साली 'सायन्स' या शोधपत्रिकेत प्रकाशित झालेल्या शोधनिबंधासाठी प्रामुख्याने हा पुरस्कार देण्यात आला. शोधनिबंधाचा विषय 'ऑक्‍सीजनच्या कमतरतेला पेशी कशा प्रतिक्रिया देतात?' असा होता. केलिन प्रामुख्याने कॅन्सरवर संशोधन करतात. 

पीटर रॅटक्‍लिफ :

ब्रिटनमधील डॉक्‍टर असलेल्या पीटर यांचा जन्म 1954 साली झाला. सध्या लंडनमधील फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटमध्ये क्‍लिनिकल रिसर्च विभागाचे संचालक आणि ऑक्‍सफर्डच्या टार्गेट डिस्कव्हरी इन्स्टिट्यूटमध्ये ते संचालक आहेत. त्यांचे मुख्य संशोधन 'हायपॉक्‍झीया'वर आहे. हायपाक्‍झीया हा ऑक्‍सीजनच्या कमतरतेमुळे होणारी शारीरिक व्याधी आहे. 

ग्रेग सेमेन्झा : 

न्यूयॉर्क शहरात 1956 साली जन्मलेले सेमेन्झा बीटा थालमेसीयावर काम करत आहे. सध्या ते जॉन हाफकिन्स इन्स्टिट्यूट फॉर सेल इंजिनिअरिंगमध्ये व्हॅस्क्‍युलर रिसर्च प्रोग्रामचे संचालक म्हणून कार्यरत आहे.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com