जगभरात प्रचंड चढ्या दराने विकलं जातंय रेमेडीसिवीर, कारण...

जगभरात प्रचंड चढ्या दराने विकलं जातंय रेमेडीसिवीर, कारण...

मुंबई  : कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरलेले रेमेडिसीविर औषध सध्या जगभरातील विकसित देशांमध्ये चढ्या दराने विकले जात आहेत. अमेरिकेत हे औषध 2,520 ते 2,800 डॉलर म्हणजेच 1 लाख 90 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत विकले जात आहे. शिवाय अमेरिकेत या औषधांचा तुटवडा असल्याने या औषधाच्या निर्यातीवर देखील बंदी घालण्यात आल्याने जगभरातील इतर देशांमध्ये देखील हे औषध चढ्या दराने विकले जात आहे.

रेमेडिसीविरपेक्षा डेक्सामिथेसोन हे औषध कोरोना रुग्णांसाठी अधिक उपयुक्त आणि स्वस्त असल्याचे ब्रिटिश संशोधकांचे म्हणणे आहे. यापूर्वी केलेल्या चाचण्यांमध्ये  डेक्सामिथेसोन इंजेक्शन हे कोरोना बाधित रुग्णांसाठी गुणकारी असल्याचे सिद्ध झालं आहे. या औषधामुळे कोरोना रुग्णांचा मृत्युदर कमी झाला आहे. त्यामुळे अमेरीकेतील ड्रग्स प्रायसिंग रिसर्च गृप 'दि इन्स्टिट्यूट फॉर क्लिनिकल ऍण्ड इकॉनॉमिक रिव्ह्यू' ने या औषधांच्या किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला.

रेमेडिसीविर या औषधाला सध्या सर्वाधिक मागणी आहे. या औषधामुळे कोरोना बाधित रुग्णाची तब्येत लवकर सुधारत असल्याचे दिसते. त्यामुळे अमेरिका आणि जपान ने आपात्कालीन परिस्थितीत हे औषध वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर असणाऱ्या गंभीर रुग्णांना रेमेडिसीविर हे औषध उपयुक्त ठरले असून हे डेक्सामिथेसोन औषधापेक्षा अधिक गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. रेमेडिसीविर औषधामुळे गंभीर रुग्ण बरे होत असून मृत्युदर कमी झाला आहे. कोरोना रुग्णांसाठी सध्या रेमेडिसीविर हे एकमात्र औषध उपलब्ध असून रुग्णालयात त्याचा पाच दिवसांचा कोर्स दिला जात आहे. रुग्णालयांशिवाय इतर रुग्णांना ही या औषध उपलब्ध व्हावे यासाठी कंपनीने आपली उत्पादन क्षमता वाढवली आहे. 

हे औषध अमेरिकेत प्रति कोर्स 2 लाख 35 हजार किंवा प्रति इंजेक्शन 40 हजार रुपयांचा खर्च आहे. यापूर्वी प्रति इंजेक्शनसाठी 25 हजार रुपये आकारले जात होते, त्यात आता 33 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जगातील विकसित देशांमध्ये अश्या प्रकारे या औषधांच्या किंमती वाढल्या आहेत.

गिलियड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल ओडे यांनी सांगितले की, या औषधांच्या किमतीपेक्षा अधिक मौल्यवान रुग्णांचा जीव आहे जो या औषधामुळे वाचता येतो. या औषधामुळे रुग्ण लवकर बरा होत असल्याने अमेरिकेतील प्रत्येक रुग्णामागील 12 हजार डॉलरचा खर्च वाचतोय. युनायटेड स्टेट सरकार या औषधांसाठी अनुदान देत असल्याने औषधाची किंमत कमी होणे आवश्यक असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. 

औषधांच्या चढ्या किमतींवर तेथील लोकप्रतिनिधींनी जोरदार टीका केली आहे. कोरोना रुग्णांसाठी आवश्यक या अगोदरच उपलब्ध असणाऱ्या औषधांसाठी वाढीव किंमत घेणे चुकीचे असून ही रुग्णाची आर्थिक लूट असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इबोला सारख्या रोगाच्या इलाजावर देखील हे औषध परिणामकरक ठरले नसून हे औषध कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त असल्याचे सांगणे ही अतिशयोक्ती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सध्या युरोपपेक्षा अमेरिकेत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत तेथील प्रत्येक रुग्णालयात हे औषध उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अमेरिकेमधील हेल्थ अँड ह्यूमन सर्विसकडून हे औषध मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या या औषधांचा तुटवडा जाणवत आहे. तुटवडा दूर करून आवश्यकतेनुसार हे औषध उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

अमेरिकेत सप्टेंबरपर्यंत 5 लाख इंजेक्शन उपलब्ध करण्याचा प्रयत्न कंपनीकडून करण्यात येत आहे. कंपनीने जुलैमध्ये 90 टक्के उत्पादन केवळ याच औषधाचे घेणार असून ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये 100 टक्के याच औषधाचे उत्पादन घेतले जाणार आहे. सध्या अमेरिकेलाच या औषधाची गरज सर्वाधिक असल्याने त्यांनी या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. बँक ऑफ कॅनडा च्या अंदाजानुसार या औषधामुळे सन 2020 मध्ये 2.3 बिलियन डॉलर ची उलाढाल होण्याची शक्यता आहे. 

remdesivir medicine is sold at higher rates in world market read important news 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com