मास्कमुळे घातक वायू तयार होत नाही; संशोधकांचे स्पष्टीकरण

पीटीआय
Sunday, 4 October 2020

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी तोंड व नाक मास्कने झाकून घेतल्याने श्‍वासोच्छ्वासद्वारे कार्बन डायऑक्साइडने मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होत नाही, असा खुलासा ‘अमेरिकन थोरासिस सोसायटी’च्या वार्षिक अंकात केला आहे. अगदी फुफ्फुसाचे आजार झालेल्या रुग्णांवरही त्याचा विपरीत परिणाम होत नाही, असे यात म्हटले आहे.

ह्युस्टन - कोरोनाला दूर ठेवण्यासाठी तोंड व नाक मास्कने झाकून घेतल्याने श्‍वासोच्छ्वासद्वारे कार्बन डायऑक्साइडने मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होत नाही, असा खुलासा ‘अमेरिकन थोरासिस सोसायटी’च्या वार्षिक अंकात केला आहे. अगदी फुफ्फुसाचे आजार झालेल्या रुग्णांवरही त्याचा विपरीत परिणाम होत नाही, असे यात म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मास्कमुळे कार्बन डायऑक्साइड बाहेर पडण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते घातक ठरू शकते, असा दावा करण्यात येत असून, त्याच्या विरोधातील हे विधान एका संशोधनात मांडले आहे. अमेरिकेतील मियामी विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केले आहे.

जगातिल सर्वात उंच बिल्डिंग बांधणारी कंपनी पडणार बंद; 40,000 जणांना जावं लागणार घरी

कोरोनावर प्रतिबंधक उपाय म्हणून बहुतेक देशांमध्ये मास्कचा वापर अनिवार्य आहे. मात्र मास्कमुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचे कारण देऊन काही लोक त्याचा वापर करणे टाळतात. वैद्यकीय मास्क वापरण्यापूर्वी व वापरल्यानंतर  सुदृढ व्यक्तीच्या व ज्यांना फुफ्फुसांसंबंधीचे गंभीर आजार आहेत (सीओपीडी) अशी रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साडची पातळी बदलल्यावर काय समस्या उद्‍भवतात, याची पाहणी या अभ्यासात केली आहे. या लेखाचे सहलेखक मायकेल कँपोस यांनी ही माहिती दिली.

कोरोना लस लवकरच मिळणार; ब्रिटनने दिली चांगली बातमी

अभ्यासातील निरीक्षणे...
1) श्‍वास घेण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, अशा ‘सीओपीडी’ रुग्णांवरही मास्क लावण्याचा फारसा परिणाम आढळला नाही.
2) मास्क लावल्यावर काही जणांना श्‍वास घेण्‍यास त्रास झाला, तरी मास्कमुळे घातक वायू तयार होतात, हा दावा चुकीचा.
3) खेळती हवा नसेल तर हवा आत घेण्‍यास मास्कमुळे कधी कधी अडथळा येतो.
4) भरभर चालण्याने किंवा मास्क घट्ट बांधला असेल तर दम लागल्याचा अनुभव येतो.
5) असा अनुभव आल्यास चालण्याचा वेग कमी करावा, अथवा अन्य लोकांपासून सुरक्षित अंतर राखून मास्क काही काळ काढावा.

डोनाल्ड ट्रम्प यांचा आजार वाढला तर कोणाकडे जाणार सत्ता?

मास्क लावणे आवश्‍यक
1) कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मास्क महत्त्वपूर्ण
2) वैद्यकीय मास्क उपलब्ध नसेल तर कापडी दोन पदरी मास्क वापरावा.
3) फुफ्फुसांचे आजार असलेल्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी मास्क, हात धुणे, सुरक्षित अंतर यांचे पालन करावे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Researchers explain that masks do not produce harmful gases