Pig Kidney Transplant: शरीरात डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या व्यक्तीचा मृत्यू; दोन महिन्यांपूर्वी झाली होती ऐतिहासिक शस्त्रक्रिया

Richard Slayma: पूर्वी दोन पुरुषांमध्ये डुकरांचे हृदय प्रत्यारोपण करण्यात आले, परंतु दोघांचाही काही महिन्यांतच मृत्यू झाला होता.
Richard Slayman
Richard SlaymanEsakal

दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्सच्या एका व्यक्तीमध्ये डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. डुक्कराची किडनी मिळवणारा पहिला व्यक्ती म्हणून इतिहास रचणाऱ्या या व्यक्तीचे नुकतेच निधन झाल्याचे, त्याचे कुटुंब आणि रुग्णालयाने जाहीर केले.

62 रिचर्ड स्लेमन, यांच्या शरिरात मार्चमध्ये मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. तेव्हा डॉक्टरांनी अंदाज केला होता की, या व्यक्तीच्या शरिरात डुकराची किडनी किमान दोन वर्षे टिकेल.

स्लेमन हे पहिले व्यक्ती होते ज्यांच्या शरिरात डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. परंतु यापूर्वी एका ब्रेन-डेड व्यक्तीमध्ये डुकराच्या किडनीचे तात्पुरते प्रत्यारोपण करण्यात आले होते. तसेच पूर्वी दोन पुरुषांमध्ये डुकरांचे हृदय प्रत्यारोपण करण्यात आले, परंतु दोघांचाही काही महिन्यांतच मृत्यू झाला होता.

Richard Slayman
Dirty act in Restaurant: ईईई.. जेवणातील खाद्यपदार्थांवर घासायचा गुप्तांग अन् करायचा लघवी! मोठ्या हॉटेलमधील वेटरचं किळसवाणं कृत्य

2018 मध्ये किडनीचा त्रास सुरू झाल्यानंतर स्लेमन यांच्यात मानवी किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. परंतू गेल्या वर्षा स्लेमन यांना पुन्हा किडनीचा त्रास सुरू झाल होता. तेव्हा डॉक्टरांनी स्लेमन यांनी डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण करावे असे त्यांच्या डॉक्टरांनी सुचवले होते.

Richard Slayman
दहशतवादी निज्जरच्या हत्येप्रकरणी आणखी एका भारतीयाला अटक, कॅनडा पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना घेतलं ताब्यात

दरम्यान एका निवेदनात स्लेमन यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले.

"डॉक्टरांनी केलेल्या झेनोट्रांसप्लांटमुळे आमच्या कुटुंबाला रिकसोबत आणखी सात आठवडे राहायला मिळाले आणि त्या काळातील आमच्या आठवणी आमच्या मनात आणि हृदयात कायम राहतील," स्लेमन यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com