रोनाल्डोची दर्यादिली; कोरोनाग्रस्तांसाठी हॉटेलमध्ये उभारलं हॉस्पिटल!

Cristiano_Ronaldo
Cristiano_Ronaldo

लिस्बन : सध्या जिकडेतिकडे फक्त कोरोनाचीच चर्चा सुरू आहे. या संसर्गजन्य रोगाने जगातील जवळपास शंभराहून अधिक देशांना विळखा घातला आहे. हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि इतर संबंधित यंत्रणा आपापल्या परीने काम करत आहेत.

अनेक सेलिब्रिटी मंडळी आणि खेळाडूंनी नागरिकांना कोरोनाबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी आता जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू अशी ओळख असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो पुढे सरसावला आहे. रोनाल्डोने पोर्तुगालमधील त्याच्या हॉटेलमध्येच हॉस्पिटलची उभारणी करत आहे. हॉटेलला हॉस्पिटलचं रूप देत त्याठिकाणी तो कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार करणार आहे.

याबाबतची माहिती त्याने स्वत: सोशल मीडिया अकाउंटवरून दिली. सध्या जगभरातील सर्व महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्यामुळे पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार आणि ज्युव्हेंटस क्लबचा स्टार खेळाडू रोनाल्डो मायदेशी आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहे. कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असल्याने रोनाल्डोने सर्वांना एक आवाहन केले आहे.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano) on

''सध्या जग एका कठीण प्रसंगातून जात आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची अधिक काळजी घेतली पाहिजे. मी एक फुटबॉलपटू म्हणून नव्हे, तर एक मुलगा, बाप आणि माणूस म्हणून सर्वांना कळकळीची विनंती करतो की, जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनांचे पालन करा. एखाद्याचं आयुष्य वाचवण्याला प्राधान्य द्या.'' 

रोनाल्डोने आपले हॉटेल कोरोनाग्रस्तांसाठी खुले केले असून त्याठिकाणी तो हॉस्पिटलची उभारणी करत आहे. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचा खर्च तो स्वत: उचलणार आहे. तसेच कोरोनाग्रस्तांवर या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करण्यात येणार आहेत. 

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली असून आतापर्यंत जगभरातील १,५६,३९६ जणांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. त्यापैकी ८०,९५५ जण एकट्या चीनमधील आहेत. त्यापाठोपाठ इटलीमधील २१,१५७ जणांना कोरोनाची लागण झाली असून सर्वांवर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगभरातील ५८३३ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Our best it's guaranteed #finoallafine #forzajuve

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano) on

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com