Coronavirus : सुटलो बाबा एकदाचे; कोरोनाग्रस्त इराणमधील भारतीय मायदेशी परतले!

Iran_India
Iran_India

जैसलमेर : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचे आजच्या आकडेवारीवरून दिसून येते. अशातच आता परदेशातील भारतीयांनाही मायदेशी आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. 

इराण, इटलीमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे तेथील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. एअर इंडियाच्या दोन विमानांनी रविवारी (ता.१५) सकाळी जवळपास २३६ नागरिकांना इराणमधून भारतात आणण्यात आले आहे. राजस्थानच्या जैसलमेर येथील भारतीय सैन्याच्या एका कॅम्पमध्ये या नागरिकांना ठेवण्यात आले आहे. 

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, एकूण २३४ भारतीयांना इराणमधून बाहेर काढण्यात आले आहे. या सर्वांना घेऊन आलेल्या एअर इंडियाच्या दोन विमानांनी आज सकाळी जैसलमेर येथील विमानतळावर लँडिंग केले. यामध्ये एकूण १३१ विद्यार्थी आणि १०३ यात्रेकरूंचा समावेश आहे. याकामी मदत करणारे राजदूत धामू गद्दाम आणि त्यांच्या टीमचे जयशंकर यांनी आभार मानले. 

कर्नल घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''जैसलमेर येथे उभारण्यात आलेले केंद्र हे पूर्णपणे सुसज्ज असे आहे. तसेच याठिकाणी कुशल वैद्यकीय अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.'' इराणमधून आणलेल्या भारतीयांना १४ दिवस या केंद्रात ठेवले जाणार असून त्यानंतरच आवश्यक वाटल्यास त्यांना सोडण्यात येणार आहे. या सर्व भारतीय नागरिकांची काळजी घेणं यासाठी भारतीय सैन्य तत्पर आहे, असेही कर्नल घोष यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोना व्हायरस (कोविड-१९)ला साथीचा रोग म्हणून घोषित केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com