रशियाचा वर-युक्रेनची वधू, लग्नस्थळ-भारत! युद्धकाळात शुभमंगल सावधान... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage

रशियाचा वर-युक्रेनची वधू, लग्नस्थळ-भारत! युद्धकाळात शुभमंगल सावधान...

धर्मशाळा : युक्रेन आणि रशिया युद्धाला जवळपास सहा महिने उलटून गेले आहेत. दरम्यान अजूनही दोन्ही देशांतील तणाव कमी झाला नसून आजही युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांत तणाव असताना रशियामधील मुलगा आणि युक्रेनमधील एका मुलीने भारतात आपलं लग्न आवरून घेतलं आहे.

सर्गेई नोविकोव्ह या रशियन मुलाचे नाव असून आपली युक्रेनी मैत्रीण एलोना ब्रामोका हिच्यासोबत त्याने 2 ऑगस्ट रोजी धर्मशाला येथे पारंपारिक हिंदू पद्धतीने लग्नगाठ बांधली आहे. तिकडे युद्ध सुरू असताना या दोन्ही देशातील तरूणांनी नवा पायंडा घातला आहे. दरम्यान याआधीही दोन्ही देशांत तणाव सुरू असताना युक्रेनमध्ये लग्न लागले होते.

दरम्यान, या वर्षाच्या सुरूवातीपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून अनेक नागरिकांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. या तणावामुळे अनेक नागरिकांनी देश सोडून जाण्याची वेळ आली होती पण प्रेमाचा विजय होतो याचं एक उदाहरण म्हणजे हे लग्न.

या दोन्ही देशांतील तणाव कमी होण्यासाठी अनेक देशांनी प्रयत्न केले पण रशियाकडून माघार घेतली गेली नाही त्यामुळे या युद्धाचा परिणाम महागाईच्या स्वरूपात जगाला भोगावा लागला होता. हा वाद अजूनही संपला नसून या दोन तरूणांनी भारतात लग्न करून आपल्या देशाला एकोप्याचा संदेश दिला आहे.

Web Title: Russia And Ukraine Couple Marriage In India With Hindu Tradition

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..