Russia-Ukraine War: युद्धामुळे युरोझोन महागाईत होरपळणार

रशिया-युक्रेन संघर्ष: अन्नधान्य, इंधनाच्या किमती वाढण्याची भीती
russia and ukraine crisis raises Eurozone inflation Brussels
russia and ukraine crisis raises Eurozone inflation Brusselssakal

ब्रुसेल्स : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे युरोपीय देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याचा धोका निर्माण झाला असून भविष्यामध्ये आर्थिक वाढीचा वेग मंदावण्याबरोबरच महागाई देखील उच्चांकी पातळीवर पोचण्याचा धोका निर्माण झाला आहे. खुद्द युरोपीय महासंघाकडून (ईयू) तसे भाकीत वर्तविण्यात आले आहे. या वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये १९ देशांचा समावेश असलेल्या युरोझोनमधील महागाईचा दर हा ७.६ टक्क्यांवर पोचेल. ही महागाईमधील आतापर्यंतची सर्वांत मोठी वाढ असल्याचे मानले जाते. याआधी हा दर ६.१ टक्क्यांवर पोचेल अशी अपेक्षा होती. मागील महिन्यामध्ये ग्राहक किंमत निर्देशांक ८.६ टक्क्यांवर पोचला होता.

आर्थिक वाढीच्या दरामध्ये घसरण होऊन तो यंदा २.६ टक्क्यांवर येणे अपेक्षित आहे. मागील वर्षीच्या ५.३ टक्क्यांच्या तुलनेमध्ये ही सर्वांत मोठी घसरण असल्याचे मानले जाते. युरोपीय महासंघाचे उपाध्यक्ष वाल्दिस दोम्ब्रोवस्कीस यांनी म्हटले आहे की, ‘‘ या संघर्षाचे युरोपीय देश आणि अर्थव्यवस्थांवरील सावट दीर्घकाळ कायम राहणार आहे.’’ युद्धामुळे इंधन आणि अन्नधान्याच्या किमती वाढत चालल्या असून याचा परिणाम महागाई, आर्थिक विकास आणि ग्राहकांच्या आत्मविश्वासावर होत असल्याचे दिसून आले आहे.

आर्थिक आव्हाने

  • डॉलरच्या तुलनेत युरो वीस वर्षांच्या नीचांकी पातळीवर

  • इंधन दरवाढ, महागाईमुळे आर्थिक समस्याही बिकट

  • अनेक देशांत कोरोना रुग्ण वाढल्याने अर्थकारणाला फटका

  • अनेक देशांना होणार गॅस पुरवठ्याबाबत अनिश्चितता

  • जीवनावश्यक वस्तू आणि सेवा आणखी महागणार

पुतीन यांच्यामुळे अनिश्चितता

रशियाने नैसर्गिक वायूचा पुरवठा आणखी कमी केला तर युरोपातील ऊर्जा संकट आणखी गंभीर होण्याचा धोका आहे. सध्या सगळेच युरोपीय देश हे हिवाळ्यासाठी गॅस साठवून ठेवू लागले आहेत. दुसरीकडे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याबाबत आताच भाकीत वर्तविणे अवघड असल्याने आर्थिक अनिश्चितता कायम आहे. पुढचे सगळे आर्थिक चित्र हे युद्धावर अवलंबून असेल असे युरोपीय महासंघाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com