जगात चार आठवड्यात उलथापालथ; अद्याप युद्ध संपण्याची चिन्हं नाहीत!

युद्ध ठरलं अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणापुढील मोठं आव्हान
Russia-Ukraine War
Russia-Ukraine War Sakal

नवी दिल्ली : रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला आता चार आठवडे झाले आहेत. या युद्धाचे केवळ युक्रेन आणि रशियावरच नव्हे तर संपूर्ण जगावर परिणाम झाले आहेत. अनेक दशकांनंतरचा हा सर्वाधिक वाईट हिंसाचार ठरला आहे. तसेच या वादामुळं युरोपची भू-राजकीय प्रदेशात बदल झाला आहे. युद्धाचा थेट परिणाम हा जागतीक अर्थव्यवस्थेवर झाला असून अन्न संकटही निर्माण झालं आहे. (Russia invasion of Ukraine has changed the world in 4 weeks)

रशियाचं हे आक्रमण काही महिने चालेल असं भाकीत वेस्टर्न इंटेलिजन्स एजन्सीजनं आणि सोशल मीडियावरील विश्लेषकांनी व्यक्त केलं होतं. पण याच्या परिणामांमुळं जगाला हादरा बसला आहे. यामध्ये सर्वाधित आश्चर्याची बाब म्हणजे रशियन लष्करी मोहिम ही मोठ्या प्रमाणावर विनाशकारी ठरली आहे.

युद्ध ठरलं अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणापुढील मोठं आव्हान

महिन्याभरापासून सुरु असलेल्या या युद्धामुळं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासाठी हे आतापर्यंतचे सर्वात मोठे परराष्ट्र धोरणामधील आव्हान ठरलं आहे. अमेरिकेला चीनवर लक्ष केंद्रित करण्याची योजना होती. परंतु त्याऐवजी आपत्कालीन नाटो शिखर परिषदेला उपस्थित राहावं लागणार आहे. या युद्धासाठी पाश्चात्य शस्त्रं, ज्यापैकी बरीचशी वॉशिंग्टनने पुरविली आहेत. ही शस्त्रे युक्रेनला रशियाविरोधात मदत करण्यात महत्त्वाची ठरली आहे. या युद्धाच्या निकालावर भाष्य करताना बहुतेक तज्ज्ञ म्हणतात की, दोन्ही बाजूंना विजय मिळणे कठीण आणि महागडे असेल. उलट हा संघर्ष आता आणखी हिंसक आणि आक्रमकता वाढवणारा असेल.

युक्रेनच्या नागरिकांवर काय झालाय परिणाम

या युद्धामध्ये सुमारे 10 दशलक्ष लोक जे युक्रेनच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ एक चतुर्थांश आहेत. त्यांना आपला देश आपली घरं सोडून पळून जाणं भाग पडलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, पोलंड आणि मोल्दोव्हा सारख्या शेजारच्या देशांमध्ये निर्वासित म्हणून युक्रेनचे लोक दाखल होत आहेत.

युद्धात ४०,००० रशियन सैनिकांचा मृत्यू - नाटो

रशियाने आपल्या नुकसानीची अद्ययावत आकडेवारी जाहीर केलेली नाही. परंतू नाटोच्या एका अधिकाऱ्यानं एनबीसी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, संघटनेचा अंदाज आहे की, गेल्या चार आठवड्यांच्या युद्धात 7,000 ते 15,000 रशियन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. जखमी, पकडलेले किंवा बेपत्ता झालेल्या रशियन सैनिकांची यात भर टाकल्यास ही संख्या 30,000 ते 40,000 पर्यंत असू शकते, असंही या अधिकाऱ्यानं सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com