रशियाच्या हल्ल्यात 16 विद्यार्थ्यांचा मृत्यू; झेलेन्स्कींचा दुजोरा | Zelensky | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Volodymyr Zelensky y- Vladimir Putin

रशियाच्या हल्ल्यात 16 विद्यार्थ्यांचा मृत्यू; झेलेन्स्कींचा दुजोरा

Ukraine Russia War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसून, रशियाने युक्रेवर केलेल्या भीषण हल्ल्यात 16 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, या वृत्ताल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कि यांनी दुजोरा दिला आहे. याशिवाय रशिया हा दहशतवादी देश असल्याचेही त्यांनी म्हटले असून, आम्ही झुकणार नसून लढणार असल्याचा दृढ निश्चय केल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Ukraine President Volodymyr Zelenskyy Speech In European Parliament)

हेही वाचा: ...तर FM चॅनल्सवर कडक कारवाई होणार, केंद्राकडून निर्देश जारी

खारकिव्हमध्ये रशियानेच (Russia Attack In Kharkiv) हल्ला केल्यादा दावा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे. युरोपीय युनियनची संयुक्त बैठकीदरम्यान युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी वरील विधान केले आहे. आम्ही आमच्या जमिनीसाठी लढत आहोत आणि लढत राहणार असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

"आम्ही आमच्या भूमीसाठी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत, आम्हाला कोणी तोडू शकणार नाही, आम्ही बलवान असून, आम्ही युक्रेनियन आहोत असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर युरोपीयन संसदेतील सदस्यांनी उभे राहून त्यांच्या या भूमिकेबद्दल जोरदार टाळ्या वाजवत समर्थन दिले.

Web Title: Russia Is A Terrorist Country Says Ukraine President Zelensky

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..