युद्धाने होरपळणाऱ्या युक्रेनमध्ये आता नवे संकट; WHO ने व्यक्त केली चिंता | Russia Ukraine War | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ukraine-russia war

युद्धाने होरपळणाऱ्या युक्रेनमध्ये आता नवे संकट; WHO ने व्यक्त केली चिंता

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आजचा पाचवा दिवस आहे. या पाच दिवसात दोन्ही देशांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात हजारो नागरिकांचे जीव गेले आहेत. दरम्यान, या कठिण परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) युक्रेनमध्ये उद्बवलेल्या ऑक्सिजन टंचाईबाबत चिंता व्यक्त केली असून, वेळीच ही टंचाई दूर न केल्यास युक्रेनमध्ये नवे संकट उभे राहिल, अशी भिती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. (Oxygen Supply Issue In Ukraine)

हेही वाचा: Ukraine Russia War LIVE : रशियाचे ५ हजार सैनिक ठार, युक्रेनच्या दुतावासाचा दावा

सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनची राजधानी किवसह इतर भागांमधील रूग्णालयात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची कमतरता जाणवत असून, ऑक्सिजनचा तातडीने पुरवठा न झाल्यास येथील परिस्थिती गंभीर होऊ शकते, अशी भीती WHO ने व्यक्त केली आहे.

हेही वाचा: ''महाराजांच्या इतिहासासोबत छेडछाड कराल तर...''

कोरोना रूग्णांसह इतरांनाही ऑक्सिजनजी गरज

जगातील कोरोना (Corona) महामारीचे संकट अद्यप संपलेले नसून अजूनही जगातील काही रूग्णांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. त्याशिवाय नवजात बालके, गर्भावती यांच्यासह वद्धांना ऑक्सिजनची गरज कधीही लागू शकते. त्यामुळे उद्बवलेल्या ऑक्सिजन टंचाईवर तात्काळ मार्ग काढून तो पुर्ववत होणे गरजेचे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

युक्रेनमध्ये आज घडीला साधरण 600 रूग्णालये असून येथे अंदाजे 1700 कोरोना रूग्णांवर उपचार केले जात आहेत. युद्धामुळे युक्रेनमध्ये वीजेचेही संकट निर्माण झाले असून, याचा परिणाम आरोग्य सेवांवरही होताना दिसून येत आहे. (Ukraine Latest News In Marathi)

Web Title: Oxygen Supply Issue In Ukraine Hospital Due To War

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top