रशियाच्या 'स्फुटनिक' लशीचे 100 भारतीयांवर होणार परिक्षण; DCGI ने दिली परवानगी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

रशियाच्या या स्फुटनिक-व्ही लशीची चाचणी भारतात 100 लोकांवर घेण्याची परवानगी आता दिली गेली आहे.

मास्को : कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. जगातील बहुतांश देश कोरोनाच्या हाहाकारने त्रस्त झाले आहेत. कोविड-19 वर प्रभावी अशी लस तयार करण्यासाठी संपूर्ण जगभरात प्रयत्न सुरु आहेत. कोरोनावर सर्वांत आधी लस तयार करण्याचा दावा रशियाने केला होता. मात्र, घाईगडबडीत चाचणीशिवाय लशीला मंजूरी देण्याबाबत अनेक जाणकारांनी चिंता व्यक्त केली होती. 

हेही वाचा - US Election: 'ट्रम्प vs बायडेन' कोण ठरलं वरचढ? वाचा डिबेटमधील महत्वाचे मुद्दे

रशियाच्या या स्फुटनिक-व्ही लशीची चाचणी भारतात 100 लोकांवर घेण्याची परवानगी आता दिली गेली आहे. Indian Central Drugs Standard Control च्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल यांनी गुरुवारी ही माहीती दिली. डीजीसीआयने फार्मास्युटीकल्स कंपनी डॉ. रेड्डी यांच्या प्रयोगशाळेद्वारे हे परिक्षण करण्याची परवानगी दिली गेली आहे. या ट्रायलची वेळ आणि तारीख कंपनीद्वारेच ठरवण्यात येणार आहे. 

मागच्या आठवड्यात डीजीसीआयच्या विशेष तज्ञांच्या समितीने डॉ. रेड्डी यांच्या प्रयोगशाळेला कोरोना लस स्फुटनिक-व्हीच्या दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलला मंजूरी देण्यासंदर्भात मागणी केली होती. मिळालेल्या माहीतीनुसार, डॉ. रेड्डी लॅबने म्हटलंय की दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलसाठी 100 व्हॉलेंटीअर्सची आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी 1400 व्हॉलेंटीअर्सची गरज भासेल. सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटलंय की, दुसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष आल्यानंतरच तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी पुढे जाता येईल. 

हेही वाचा - Corona Outbreak: युरोपात कोरोनाची दुसरी लाट; फ्रान्समध्ये ओलांडला १० लाखाचा टप्पा!
13 ऑक्टोबर रोजी एएनआयने वृत्त दिलं होतं की डॉ. रेड्डी लॅबने डीसीजीआयमध्ये नव्या प्रोटोकॉलसाठी अर्ज केला होता. जेणेकरुन रशियाच्या कोरोना लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलसाठी मंजूरी मिळवता येईल. भारतात औषध निर्मिती करणाऱ्या डॉ. रेड्डी लॅबने स्फुटनिक-व्ही लशीच्या क्लिनिकल ट्रायलसोबतच त्या लशीच्या वितरणासाठीही भागीदारी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russia Sputnik V COVID-19 vaccine test on 100 Indian volunteers soon